मेष (ARIES) : आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशम भावात असणार आहे. आज आपल्या एखाद्या कामास किंवा प्रकल्पास सरकारी लाभ मिळतील. कामाच्या ठिकाणी महत्वाच्या मुद्दया संबंधी वरिष्ठांशी विचार-विनिमय होतील. कार्यालयीन कामानिमित्त प्रवास करावा लागेल. कार्यभार वाढेल. कौटुंबिक गोष्टीत मनापासून रस घेऊन कुटुंबियाबशी सल्ला-मसलात कराल. गृहसजावटीचं आयोजन कराल. आईशी जास्त जवळीक निर्माण होईल.
वृषभ (TAURUS) : आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात असणार आहे. व्यापार्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. नवीन आयोजन ते हाती घेऊ शकतील. आर्थिक लाभ प्राप्त होतील. विदेशातील मित्र किंवा नातेवाईक यांच्याकडून येणार्या बातम्या आपणाला भाव विवश बनवतील. दूरच्या प्रवासाची शक्यता आहे. कामाचा व्याप वाढेल.
मिथुन (GEMINI) : आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टम भावात असणार आहे. आज अनियंत्रित रागाला लगाम घालावा लागेल. बदनामी आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहणं हिताचं ठरेल. खर्च अधिक झाल्यानं आर्थिक चणचण भासेल. कुटुंबीय आणि कार्यालयातील सहकारी यांच्याशी मतभेद किंवा वादविवादाचे प्रसंग येतील. त्यामुळं मन सुन्न राहील. आजारी व्यक्तीची नव्याने तपासणी किंवा शस्त्रक्रिया शक्यतो आज करू नका. मानसिक शांतीसाठी प्रयत्न करा.
कर्क (CANCER) :आज चंद्र मकर आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातव्या भावात असणार आहे. आजचा दिवस सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रांत आपणाला लाभदायक ठरेल. मौज-मजेची साधने, उत्तम दागीने आणि वाहन खरेदी होईल. मौज-मस्ती आणि मनोरंजनात वेळ खर्च होईल. तसेच भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास आपणास सुखद अनुभव देईल. दांपत्य जीवनात उत्कट प्रेमाचा अनुभव येईल. भागीदारीत फायदा होईल. सहलीची शक्यता आहे.
सिंह (LEO) :आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहाव्या भावात असणार आहे. आज उदासीन वृत्ती आणि संशयाचे काळे ढग आपल्या मनाला वेढून टाकतील. त्यामुळं मनःस्वास्थ्य लाभणार नाही. तरीही घरात शांततेचं वातावरण राहील. दैनंदिन कामात जरा अडचणी येतील. खूप परिश्रम कराल. वरिष्ठांशी वाद-विवाद टाळा.
कन्या (VIRGO) : आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचव्या भावात असणार आहे. आजचा दिवस चिंताने भरलेला असेल. पोटाच्या त्रासामुळं प्रकृती बिघडेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येतील. अचानक धनखर्च होईल. बौद्धिक चर्चेत असफल व्हाल. प्रियव्यक्तीचा सहवास लाभेल. भिन्नलिंगी व्यक्तीकडं आकर्षित व्हाल. शेअर, सट्टा ह्यापासून दूर राहणं उचित ठरेल.
तूळ (LIBRA) :आज चंद्र मकर राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या भावात असणार आहे. आज आपण खूप भावनाशील व्हाल आणि त्यामुळं मानसिक अस्वास्थ्य राहील. आईशी मतभेद होतील किंवा तिच्या प्रकृतीची काळजी राहील. प्रवासासाठी आजचा दिवस अनुकूल नाही. कौटुंबिक आणि जमीन-जुमल्या संबंधी चर्चा करताना दक्ष राहा. पाण्यापासून जपून राहा.