महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / spiritual

'या' राशींच्या व्यक्तींनी वाहन चालवताना घ्यावी काळजी; वाचा राशीभविष्य - HOROSCOPE 08 JANUARY 2025

दैनंदिन राशीभविष्यावरून रोजच्या घडामोडींचा अंदाज येतो. तुमचा आजचा दिवस कसा जाईल? काय घडणार आजच्या दिवसात?, हे जाणून घ्या 'ईटीव्ही भारत'वरील राशीभविष्यात.

Horoscope
राशीभविष्य (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 8, 2025, 1:11 AM IST

मेष (ARIES) : मेष राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम भावात असेल. आज आपले प्रत्येक काम उत्साहात पार पडेल. शरीर, मन प्रसन्न राहिल. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील. मित्र आणि स्नेही यांच्यासह आनंदात वेळ घालवाल. आईकडून लाभ होईल. एखादा प्रवास संभवतो. धनलाभ, रुचकर भोजन आणि भेटवस्तू मिळाल्यानं आपला आनंद वाढेल.

वृषभ (TAURUS) : मेष राशीचा चंद्र आज आपल्या बाराव्या भावात असेल. आज राग आणि निराशेची भावना मनात पसरेल. प्रकृती साथ देणार नाही. घर - परिवाराच्या चिंतेबरोबरच खर्चा बाबतीतही चिंता राहील. आपल्या कठोर बोलण्यामुळं कोणाशी मतभेद किंवा भांडण होण्याची शक्यता आहे. परिश्रम वाया जात आहेत असं वाटेल. गैरसमजापासून जपून राहावे.

मिथुन (GEMINI) :मेष राशीचा चंद्र आज आपल्या लाभात असेल. आज विविध मार्गांनी लाभ झाल्यामुळं हर्षोल्हास वाढेल. पत्नी आणि मुलांनकडून फायदेशीर बातमी मिळेल. मित्रांशी संवाद साधल्यानं आनंद मिळेल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळेल. भोजनाचा आस्वाद घेता येईल.

कर्क (CANCER) : मेष राशीचा चंद्र आज आपल्या दशम भावात असेल. आज गृह सजावटीवर आपण विशेष लक्ष द्याल. घरगुती वापराचे नवीन साहित्य खरेदी कराल. व्यापारी आणि नोकरदार लाभाची किंवा बढतीची अपेक्षा करू शकतात. कुटुंबात सुख-शांती नांदेल. सरकारी लाभ मिळतील. आपली प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक लाभ होईल. आज सर्व कामे शांतपणे आणि व्यवस्थितपणे पार पाडू शकाल.

सिंह (LEO) : मेष राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात असेल. आजचा दिवस आळस, थकवा यात जाईल. आपल्या तापट स्वभावामुळं मानसिक तणाव राहील. पोट दुखीनं हैराण व्हाल. यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील. नकारात्मक विचार, वर्तन आणि नियोजनापासून दूर राहावे. एखादा प्रवास संभवतो. रागावर नियंत्रण ठेवावं लागेल.

कन्या (VIRGO) : मेष राशीचा चंद्र आज आपल्या अष्टमात भावात असेल. आज वाणीवर संयम ठेवावा लागेल. आज नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील. आज आपला राग वाढणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. कुटुंबीयांशी वाद झाल्यानं आपण दुःखी व्हाल. शक्यतो प्रवास टाळा. हितशत्रूपासून सावध राहा.

तूळ (LIBRA) :मेष राशीचा चंद्र आज आपल्या सातव्या भावात असेल. आज सांसारिक जीवनाचा आनंद खर्‍या अर्थाने लुटाल. सामाजिक हेतूने कुटुंबीयांसह बाहेर जावे लागेल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. व्यापारी वर्गाला व्यापारात वाढ होईल. सामाजिक क्षेत्रात सफलता आणि कीर्तीलाभ होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ संभवतो.

वृश्चिक (SCORPIO) :मेष राशीचा चंद्र आज आपल्या सहाव्या भावात असेल. आज अचानक काही घटना घडतील. ठरलेल्या भेटी रद्द झाल्यानं निराश व्हाल. हाती आलेली संधी सुटून जात असल्याचं दिसेल. कुटुंबीयांशी मतभेद होतील. आईककडून एखादी अप्रिय बातमी मिळाल्यानं मन व्यथित होईल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात. प्राप्ती कमी व खर्च जास्त अशी स्थिती राहील. शक्यतो आज नवीन कामाची सुरूवात करू नका.

धनू (SAGITTARIUS) :मेष राशीचा चंद्र आज आपल्या पाचव्या भावात असेल. आज आपण संततीचा अभ्यास व स्वास्थ्य ह्यामुळे चिंतीत व्हाल. पोटाच्या तक्रारी सतावतील. कामातील अपयशाने आपण निराश व्हाल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. साहित्य, लेखन, कला याविषयांची गोडी वाढेल. प्रिय व्यक्तीचा सहवास संस्मरणीय होईल. आज वाद-विवाद किंवा चर्चा ह्यात भाग घेऊ नका.

मकर (CAPRICORN) : मेष राशीचा चंद्र आज आपल्या चौथ्या भावात असेल. आज आपली मनःस्थिती व आरोग्य चांगलं राहणार नाही. कौटुंबिक कटकटीमुळं मन दुःखी होईल. उत्साह आणि आनंद यांचा अभाव राहील. स्वजनांशी मतभेद होतील. छाती संबंधी आजार होऊ शकतो. झोप येणार नाही. मानहानी होऊ शकते. एखादा अपघात संभवतो.

कुंभ (AQUARIUS) : मेष राशीचा चंद्र आज आपल्या तिसऱ्या भावात असेल. आज आपणास मनाने हलके वाटेल. चिंता नाहीशी होऊन उत्साह वाढेल. घरात भावंडांसह काही आयोजन कराल. त्यांच्यासह वेळ आनंदात जाईल. मित्रांच्या भेटी होतील. जवळच्या ठिकाणी सहलीसाठी जाऊ शकाल. विरोधकांवर मात करू शकाल. नशिबाची साथ लाभेल. वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल.

मीन (PISCES) :मेष राशीचा चंद्र आज आपल्या दुसऱ्या भावात असेल. आज आपणास खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. रागावर आणि वाणीवर सुद्धा ताबा ठेवावा लागेल. आर्थिक देवाण-घेवाणीचे व्यवहार सावधपणे करावे लागतील. शारीरिक, मानसिक आरोग्य मध्यम राहील. कुटुंबियांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. मनात नकारात्मक विचार येतील. खाण्यापिण्यावर संयम ठेवावा लागेल.

हेही वाचा -

  1. मकर संक्रात 2025: यंदा संक्रात कशावर आली आहे? कोणत्या रंगाची साडी नेसावी? घ्या जाणून
  2. दक्षिण भारतातील 'पोंगल' म्हणजे नक्की काय? कसा साजरा केला जातो हा सण, घ्या जाणून
  3. मकर संक्रांत 2025 काय आहे शुभ मुहूर्त? मकर संक्रांतीला काळ्या रंगाचेच कपडे का परिधान करतात? घ्या जाणून

ABOUT THE AUTHOR

...view details