महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / spiritual

'मेष ते मीन' सर्व राशींसाठी कसा असेल आजचा दिवस? वाचा राशीभविष्य

आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन राहील चांगलं, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य कसं असेल, जाणून घेऊ 'ईटीव्ही भारत'वरील राशीभविष्यात.

Horoscope
राशीभविष्य (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : 24 hours ago

मेष (ARIES) :आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. आज कटकटीचा अनुभव येईल. शरीरास आळस, थकवा जाणवेल तर मन अशांत राहील. आज संताप वाढल्यानं कामे बिघडतील. व्यवहारात न्यायी राहण्याचा प्रयत्न करा. निर्धारीत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा लागेल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. आपला प्रत्येक प्रयत्न चुकीच्या मार्गाने होण्याची शक्यता आहे.

वृषभ (TAURUS) :आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस काळजीपूर्वक राहण्याचा आहे. नवीन कार्याचा आरंभ शक्यतो टाळावा. स्वास्थ्य बिघडू शकते. खाण्या-पिण्याकडं विशेष लक्ष देणं हिताचं ठरेल. शारीरिक थकवा आणि मानसिक व्यथा अनुभवाल. कार्यालयात कामाचा व्याप वाढल्यानं अधिक थकवा जाणवेल. प्रवास लाभदायी होणार नाहीत.

मिथुन (GEMINI) : आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र सातव्या स्थानी असेल. आजचा दिवस आनंदात आणि भोग विलासात जाईल. भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास घडेल. मित्र आणि प्रिय व्यक्तीसह मनोरंजनात्मक प्रवास घडेल. वाहनसुख मिळेल. नववस्त्रांची खरेदी होईल. प्रणयसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. . भोजनात मिष्टान्न मिळेल. प्रकृती उत्तम राहील. सामाजिक मान-सन्मान होऊन प्रसिद्धी मिळेल. वैवाहिक सुखाचा आनंद उपभोगता येईल.

कर्क (CANCER) : आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र सहाव्या स्थानी असेल. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. घरात शांती आणि आनंदाचं वातावरण राहील. सुखद प्रसंग घडतील. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल. प्रकृती उत्तम राहील. कुटुंबियांसह आनंदात वेळ जाईल. नोकरीत लाभ होतील. सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य मिळू शकेल. मित्र - मैत्रिणींच्या सहवासानं आनंद होईल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल.

सिंह (LEO) : आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र पाचव्या स्थानी असेल. आजचा दिवस आनंददायी आहे. आज आपण अधिक कल्पनाशील बनाल. साहित्य नवनिर्मितीमुळं काव्य लेखनाची प्रेरणा मिळेल. आवडत्या व्यक्तीची भेट फलदायी होईल आणि त्यामुळं दिवसभर मन आनंदी राहील. संततीच्या दृष्टीनं प्रगतीची बातमी मिळेल. अभ्यासाच्या दृष्टीनं विद्यार्थ्यांना खूप चांगला दिवस आहे. मित्र भेटतील. स्त्री वर्गाकडून लाभ होईल. आज आपल्या हातून एखादा परोपकार घडेल.

कन्या (VIRGO) :आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र चौथ्या स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. शारीरिक, मानसिक स्वास्थ्य बिघडेल. काही अडचणींमुळं मन दुःखी राहील. स्फूर्तीचा अभाव असेल. स्वकीयांचे गैरसमज होतील. आईची तब्बेत बिघडेल. घर, जमीन इ. कागदपत्रे जपून ठेवावी लागतील. एखाद्या स्त्रीमुळं अडचणीत याल. पाण्यापासून काही त्रास संभवतो. मानहानी होण्याची शक्यता आहे. वायफळ खर्च होतील.

तूळ (LIBRA): आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र तिसऱ्या स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. भावंडांशी संबंध चांगले राहतील. त्यांच्याशी घराशी संबंधित प्रश्नांची चर्चा होईल. एखाद्या छोटया सहलीस जाण्याचे यशस्वी नियोजन कराल. धनलाभ होईल. परदेशातून चांगल्या बातम्या मिळतील. व्यावहारीक कारणांनी प्रवास घडेल. नव्या कामाचा आरंभ करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य मिळेल. गुंतवणूक करण्यास दिवस अनुकूल आहे. नशिबाचा साथ लाभेल.

वृश्चिक (SCORPIO) : आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र दुसऱ्या स्थानी असेल. आजचा दिवस साधारणच आहे. वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. कुटुंबात वाद संभवतात. कुटुंबातील सदस्यांचे गैरसमज होण्याची शक्यता आहे. शारीरिक त्रास आणि मनात मरगळ राहील. नकारात्मक विचार येतील. अवैध कार्यापासून दूर राहणं हितावह राहील. विद्यार्थ्यांना अध्ययनात अडथळे येण्याची शक्यता आहे.

धनू (SAGITTARIUS) : आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज संततीचे सुख आणि स्वास्थ्य सुधारेल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात यश प्राप्त होण्यास आजचा दिवस उत्तम आहे. विदेश व्यापारात लाभ होईल. आपल्या हातून एखादे मंगल कार्य संपन्न होईल. स्नेहीवर्ग आणि मित्रांच्या सहवासानं आनंद होईल. आर्थिक लाभ होईल. वैवाहिक जोडीदारा कडून सुख-समाधान मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. सुग्रास भोजनाची प्राप्ती होईल. आरोग्य उत्तम राहील.

मकर (CAPRICORN) : आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र बाराव्या स्थानी असेल. आज आरोग्याच्या तक्रारी राहतील. विचित्र अनुभव येतील. व्यवसायात सरकारी हस्तक्षेप वाढेल. मांगलिक कार्यावर खर्च कराल. परोपकारी व्यवहार वाढतील. शत्रूंचा त्रास होईल. डाव्या डोळ्यास त्रास होईल. स्त्री व संततीची काळजी राहील. एखादी दुर्घटना संभवते.

कुंभ (AQUARIUS) : आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस मंगल कार्य व नवीन कार्य ह्यांच्या आयोजनासाठी अनुकूल आहे. अविवाहितांचे विवाह ठरतील. पत्नी आणि संततीकडून चांगल्या बातम्या मिळतील. कौटुंबिक जीवन आणि दांपत्य जीवन ह्यात सुखा- समाधानाचा अनुभव येईल. मित्रमंडळ आणि वडीलधार्‍यांकडून तसेच नोकरी - व्यवसायात बहुविध लाभप्राप्ती होईल. उत्पन्नाच्या साधनांत वाढ होईल.

मीन (PISCES) : आज चंद्र धनु राशीत आहे. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज आपले प्रत्येक काम सफलतापूर्वक पूर्ण होईल. नोकरीत पदोन्नती मिळेल. व्यापार्‍यांची येणी वसूल होतील. वडील आणि वडीलधार्‍यांकडून लाभ होईल. आर्थिक लाभ होऊन कुटुंबात आनंद पसरेल. सरकारकडून लाभ मिळतील. सार्वजनिक मान- सन्मान वाढतील. कौटुंबिक जीवनात सुख - शांती लाभल्यानं धन्यता वाटेल.

हेही वाचा -

कार्तिकी एकादशी 2024: विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उत्साहात संपन्न, यंदा मानाचे वारकरी ठरले 'हे' दाम्पत्य

ABOUT THE AUTHOR

...view details