महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / spiritual

तिसरा श्रावणी सोमवार: 'या' राशींवर राहणार महादेवाची अपार कृपा, वाचा राशीभविष्य - Horoscope 19 August 2024

Horoscope 19 August 2024 : ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलाचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो, तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन चांगलं राहील हे आपण 'ईटीव्ही भारत'वरील या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.

Horoscope 2024
राशी भविष्य 2024 (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 19, 2024, 12:10 AM IST

मेष (ARIES) :चंद्र आज मकर राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दशमात भावात असेल. आजचा दिवस थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास आणि प्रवास ह्यासाठी उत्तम आहे. व्यापार विषयक कामासाठी दिवस लाभदायक आहे. घरात शुभ प्रसंगाचे नियोजन होईल. जुगार, शेअर्स यांत आज फायदा होईल. पत्नीच्या आरोग्याविषयी काळजी राहील.

वृषभ (TAURUS) : चंद्र आज मकर राशीत आहे. तो आपल्या राशीपासून भाग्यात भावात असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. व्यवसायात नवीन विचार प्रणाली अंमलात आणाल. प्रकृतीकडं थोडं लक्ष द्यावं लागेल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात. अचानकपणे एखाद्या संकटास सामोरे जावे लागेल. व्यापारात पैशाच्या देवाण-घेवाणीसाठी केलेला प्रवास लाभदायी ठरेल. नोकरीत बढती संभवते. संततीच्या प्रगतीमुळं मन प्रसन्न राहील. कौटुंबिक जीवन आनंदी राहील.

मिथुन (GEMINI) : चंद्र आज मकर राशीत आहे. तो आपल्या राशीपासून अष्टमात भावात असेल. आज मनात नकारात्मक विचार येतील, जे दूर करावे लागतील. अपघात होण्याची शक्यता असल्यानं वाहन सावधपणे चालवावे. अचानकपणे खर्च वाढतील. व्यापार-व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल. दुपारनंतर वैचारिक घोळ निर्माण होईल. मन बेचैन होईल. संततीच्या समस्येमुळं काळजी वाढेल. खर्चाचे प्रमाण वाढणार नाही याकडं लक्ष द्यावं लागेल.

कर्क (CANCER) : चंद्र आज मकर राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सातवा भावात असेल. आज आपणास स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद, सुंदर वस्त्रालंकारांचा लाभ व भिन्नलिंगी व्यक्तींचा सहवास लाभल्यानं आपण आनंदित व्हाल. आपली आर्थिक बाजू मजबूत होईल. मन मात्र भरकटत राहील. अकस्मात पैसा खर्च होईल. भागीदारांशी मतभेद वाढतील. नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. नवीन कामे सुरू करताना अडचणी येतील.

सिंह (LEO) : चंद्र आज मकर राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सहावा भावात असेल. आजचा दिवस व्यापार वृद्धी करण्यास अनुकूल आहे. व्यवसायातील आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. योग्य कारणांसाठी पैसा खर्च होईल. परदेशस्थ व्यावसायीकांमुळं लाभ संभवतात. धनवृद्धि संभवते. विचारात एकसुत्रीपणाचा अभाव जाणवेल. प्रवास होतील. अचानकपणे पैसा खर्च होईल. भागीदारांबरोबर मतभेद असले तरी परिस्थिती अनुकूल राहील. रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. नवीन कामात अडथळे येतील.

कन्या (VIRGO) :चंद्र आज मकर राशीत आहे. तो आपल्या राशीपासून पाचवा भावात असेल. आजचा दिवस सौख्यदायी आहे. अलंकार खरेदी करू शकाल. कलेत आवड निर्माण होईल. व्यापारासाठी दिवस उत्तम आहे. आर्थिक बाबी मार्गी लागतील. घरात आनंद आणि शांतता लाभेल. प्रकृती उत्तम राहील. व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. सहकार्यांचे उत्तम सहकार्य लाभेल.

तूळ (LIBRA) : चंद्र आज मकर राशीत आहे. तो आपल्या राशीपासून चौथ्या भावात असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. उत्साह आणि आनंद यांचा अभाव राहील. कौटुंबिक वातावरण तणावयुक्त राहील. नोकरी-व्यवसायात मानहानी होण्याची शक्यता आहे. दुपारनंतर आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. आपल्यातील कलात्मकतेस वाव मिळेल.

वृश्चिक (SCORPIO) : चंद्र आज मकर राशीत आहे. तो आपल्या राशीपासून तिसरा भावात असेल. आज संपत्तीविषयक कामे आणि घरगुती प्रश्न ह्यांचे निराकरण होऊ शकेल. नोकरदारांना आजचा दिवस अनुकूल आहे. भावंडांचे सहकार्य लाभेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. परंतु दुपारनंतर परिस्थितीत बदल होईल. नोकरी-व्यवसायात यशप्राप्ती होणे अवघड होईल. कुटुंबात एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. अवेळी खाणे पिणे होईल. निद्रानाश होण्याची शक्यता आहे. धनहानी संभवते.

धनू (SAGITTARIUS) : चंद्र आज मकर राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दुसरा भावात असेल. आज आप्तांशी मतभेद संभवतात. प्रकृती उत्तम राहील. आर्थिक फायदा होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासाकडं लक्ष द्यावं लागेल. दुपारनंतर परिस्थिती अनुकूल होईल. मनाची जी द्विधा स्थिती झाली होती, त्यात बदल होईल. शारीरिक आणि मानसिक आरोग्यात सुधारणा होईल. हितशत्रूंवर मात करू शकाल.

मकर (CAPRICORN) : चंद्र आज मकर राशीत आहे. तो आपल्या राशीपासून प्रथम भावात असेल. आज आपला कल धार्मिकतेकडं होईल. व्यापार-व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल होईल. आपली सगळी कामे सहजपणे पूर्ण होतील. जीवनात आनंद वाढेल. मात्र, दुपार नंतर नकारात्मक विचार मनात येतील. त्यामुळं निराशा वाढेल. शेअर्स व सट्टयात गुंतवणूक करू शकाल.

कुंभ (AQUARIUS) :चंद्र आज मकर राशीत आहे. तो आपल्या राशीपासून बारावा भावात असेल. आज धार्मिक आणि सामाजिक कार्यासाठी खूप खर्च होईल. मित्र मंडळींशी वाद होतील. अपघात किंवा शस्त्रक्रियेची शक्यता आहे. दुपारनंतर सर्व काही सुरळीत पार पडेल. कार्यालयात आपलाच प्रभाव असेल. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. पदोन्नतीची शक्यता आहे.

मीन (PISCES) : चंद्र आज मकर राशीत आहे. तो आपल्या राशीपासून लाभात भावात असेल. आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी उत्तम फलदायी आहे. विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील. प्रवास संभवतात. मित्रांकडून भेटवस्तू मिळतील. दुपारनंतर मात्र प्रत्येक काम जवाबदारीने करावं लागेल. व्यापार-व्यवसायावर सरकारी हस्तक्षेप वाढेल. कष्टाचे अपेक्षित फळ न मिळाल्याने नैराश्य येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -

तिसऱ्या श्रावणी सोमवारी शिवलिंगाला वाहा 'ही' शिवामूठ; 'अशी' करा महादेवाची पूजा - Third Shravan Somwar 2024

ABOUT THE AUTHOR

...view details