मेष (ARIES) :चंद्र आज मकर राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशमात स्थानी असेल. आज आपण आपल्या कौटुंबिक गोष्टींकडं अधिक लक्ष द्याल. कुटुंबीयांची एकत्रितपणे बैठक घेऊन एखाद्या महत्वाच्या विषयावर चर्चा कराल. घराचा कायापलट करण्याच्यादृष्टीनं काही नवीन मांडणी-सजावट ह्याचा सुद्धा विचार कराल. कामात समाधान लाभेल. स्त्रीयांकडून एखादा सन्मान होईल. आईशी सुसंवाद साधू शकाल. निरूत्साहीपणा सोडून द्यावा लागेल.
वृषभ (TAURUS) : चंद्र आज मकर राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज नवीन काम करण्याची प्रेरणा मिळून त्याची आपण सुरुवात सुद्धा करु शकाल. एखादया रमणीय स्थळाला भेट देऊन आपले मन प्रसन्न होईल. दूरचे प्रवास संभवतात. दूरवरच्या मित्रांच्या शुभ बातम्या समजतील. परदेशी जाण्याची संधी लाभेल. व्यापारात आर्थिक लाभ संभवतो. आरोग्य मध्यम राहील.
मिथुन (GEMINI) :चंद्र आज मकर राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा असल्यानं प्रत्येक बाबतीत सावध राहावं लागेल. आज नवीन कामाची सुरुवात न करणं हितावह राहील. क्रोधामुळं काही अनिष्ट होणार नाही ह्याकडं लक्ष द्यावं लागेल. आजारपणात नवीन उपचारास सुरवात न केल्यास उत्तम. आज खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. घरात किंवा कार्यालयात वाणीवर ताबा ठेवा. वाद टाळा. काही कारणाने खाण्या -पिण्याची आबाळ होऊ शकते. मनास शांतता लाभण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल.
कर्क (CANCER) : चंद्र आज मकर राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा पूर्ण दिवस आनंद, उत्साह आणि मनोरंजनात जाईल. भिन्नलिंगी व्यक्तींचा सहवास लाभेल. आनंदाची साधने, वस्त्रे इ. खरेदी होईल. प्रणयक्रिडेत यशस्वी व्हाल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. वाहन सौख्य लाभेल. प्रतिष्ठेस तडा जाऊ शकतो. व्यावसायिक क्षेत्रात लाभ संभवतात. प्रकृती उत्तम राहील.
सिंह (LEO) : चंद्र आज मकर राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. घरात शांतता नांदेल. नोकरीच्या ठिकाणी सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळविण्यात अडचणी येतील. दैनिक कामात अडथळे येतील. शत्रू आणि प्रतिस्पर्ध्यांमुळं त्रास होईल. वरिष्ठांशी वाद संभवतात. स्त्रियांना माहेरहून एखादी अप्रिय बातमी मिळण्याची शक्यता आहे. आज उदासीनता आणि साशंकता अधिक प्रमाणात राहिल्यानं मन उदास होईल. प्रकृती साधारण राहील. प्रयत्नांच्या मानाने यश कमीच मिळेल.
कन्या (VIRGO) : चंद्र आज मकर राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचवा स्थानी असेल. आज संततीविषयक काही चिंता निर्माण होतील. मन विचलीत होईल. पोटाच्या तक्रारीमुळं यातना होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येतील. अचानक खर्च उदभवतील. बोलताना बौद्धीक चर्चेापासून दूर राहणे हितावह राहील. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. शेअर्स, लॉटरीत नुकसान संभवते.
तूळ (LIBRA) :चंद्र आज मकर राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या स्थानी असेल. आज मानसिक थकवा जाणवेल. आपण जास्त हळवे व्हाल. मनात उठणार्या विचार तरंगांमुळं त्रास होईल. आई आणि स्त्रीविषयक चिंता सतावेल. आजचा दिवस प्रवासासाठी प्रतिकूल आहे. पाण्यापासून दूर राहणं हितावह राहील. झोप पूर्ण न झाल्यानं मानसिक ताण येईल. कौटुंबिक तसेच जमीन-जुमल्याच्या बाबतीत सावध राहावे लागेल.