हैदराबाद Chaitra Navratri 2024 : ब्रह्मपुराणानुसार नवीन वर्षाची सुरुवात चैत्र शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून सुरू होत असल्याचं मानलं जाते. चैत्र शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला भारतीय संवत्सर असंही म्हणतात. ब्रह्मानं चैत्र शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला विश्वाची निर्मिती केली, अशी अख्यायिका आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या नऊ दिवसांना चैत्र नवरात्र असं म्हणतात. वसंत नवरात्रीत आई जगदंबा दुर्गा मातेची पूजा केल्यानं इच्छित परिणाम प्राप्त होतात, अशी अख्यायिका सांगितली जाते.
माता दुर्गेची विशेष पूजा मानली जाते फलदायी :वसंत ऋतूमध्ये दुर्गा देवीची पूजा केल्यानं जीवनातील सर्व प्रकारचे अडथळे दूर होत असल्याची धारणा आहे. वसंत ऋतूतील नवरात्रीमध्ये शक्तीस्वरूप माता दुर्गा, माता लक्ष्मी आणि माता सरस्वती यांची विशेष पूजा फलदायी मानली जाते. माता दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केल्यानं सुख, समृद्धी मिळते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
माता जगदंबेच्या पूजेची पद्धत : माता जगदंबेच्या दररोजच्या पूजेमध्ये प्रथम कलशाची स्थापना केली जाते. यावेळी नवरात्र मंगळवार, 9 एप्रिल ते बुधवार 17 एप्रिलपर्यंत चालमार आहे, अशी माहिती वाराणसीतील ज्योतिषी विमल जैन यांनी दिली. चैत्र शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी सोमवार 8 एप्रिलला रात्री 11:51 वाजता सुरू होणार आहे. ती मंगळवार 9 एप्रिलला रात्री 8:32 पर्यंत राहील. प्रतिपदा तिथी मंगळवार 9 एप्रिलला असणार आहे. कलश स्थापनेचा अभिजीत मुहूर्त शुभ मुहूर्त मंगळवारी 9 एप्रिल रोजी सकाळी 11:36 ते दुपारी 12:24 आहे.
या गोष्टींकडं करू नका दुर्लक्ष :कलश रात्रीच्या वेळी बसवला जात नाही. कलशाची स्थापना करण्यासाठी अनेक खबरदारी घेण्यात येते. पूजेचा कलश लोखंडी नसावा. शुद्ध मातीचा बनवून त्यात धान्य टाकावं. माता जगदंबेला लाल ओढणी, फुलांचा हार, नारळ, फळं, सुका मेवा, मिठाई आदी अर्पण करावं. यावेळी शुद्ध देशी तुपाचा दिवा लावावा. मंत्रोच्चार करुन आरती करावी. धार्मिक विधीनुसार माता जगदंबेची पूजा करणं शुभ मानलं जाते. उपवास करणाऱ्या साधकानं आपली दिनचर्या नियमित आणि संतुलित ठेवावी. निरुपयोगी कृती आणि संभाषणं टाळावी, दररोज स्वच्छ आणि धुतलेले कपडे घालावेत. उपवास करणाऱ्या साधकानं दिवसा झोपू नये, असं ज्योतिषी विमल जैन यांनी यावेळी सांगितलं.
कोणता आहे कलश स्थापनेचा मुहूर्त :चैत्र नवरात्रीला 9 एप्रिलपासून सुरुवात होणार असून त्यासाठी मंदिरात सर्व तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती सीतापूरच्या मंदिराचे व्यवस्थापक शंकर दीक्षित यांनी दिली. तर मुख्य पुजारी लाल बिहारी म्हणाले की, "सकाळी साडेआठ वाजता आणि रात्री आठ वाजता मातेची आरती होईल. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षापासून नवरात्रीची सुरुवात होणार असून त्यामध्ये आठ नवरात्री आहेत. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलशाची स्थापना केली जणार आहे. कलश पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 11:36 पासून सुरू होऊन, ता 12:24 पर्यंत चालेल. त्यानंतर दुपारी 3:17 ते 6:14 पर्यंत शूभ काळ असणार आहे."
हेही वाचा :
- 'उगादी सण' कधी आणि कसा साजरा करायचा? जाणून घ्या उगादी उत्सवाविषयी माहिती - Ugadi 2024
- गुढी मराठी संस्कृतीची, गुढी मराठी अस्मितेची...; गुढी अशा पद्धतीनं करा उभी, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी - Gudi Padwa 2024