महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

“अजित पवार मुख्यमंत्री झाले तर मी..."; रोहित पवारांचा काकांना टोमणा

विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं, तर महाविकास आघाडीला पराभवाला सामोरं जावं लागलं. सध्या सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरु आहेत.

Rohit Pawar On Ajit Pawar
अजित पवार आणि रोहित पवार (File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 28, 2024, 10:38 PM IST

पुणे : विधानसभा निवडणूक निकाल महायुतीच्या बाजुनं लागून सहा दिवस उलटूनही मुख्यमंत्रिपदाचा पेच अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं सर्वांचं लक्ष या राजकीय घडामोडींकडं लागलं आहे. मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीच्या नेत्यांच्या दिल्लीवारी सुरु झाल्या आहेत. याचदरम्यान, "अजित पवार मुख्यमंत्री होत असतील तर मी स्वत: जाऊन फुलांचा गुच्छ त्यांना देईन. तसंच पुतण्या म्हणून त्यांचा आशीर्वाद घेईन," असं म्हणत रोहित पवार यांनी अजित पवार यांना टोमणा मारला.

मुख्यमंत्री हा भाजपाचा असणार : विधानसभा निवडणूकीचा निकाल लागून सहा दिवस झाले तरी, महायुतीकडून मुख्यमंत्री कोण? हे काही निश्चित होत नाही. महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाबाबत आमदार रोहित पवार म्हणाले की, "मला वाटत होतं की एका वर्षासाठी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद दिलं जाईल. परंतु, त्यांची पत्रकार परिषद बघितल्यावर एकनाथ शिंदे यांना संधी दिली जाणार नाही हे स्पष्ट आहे. ते केंद्रात मंत्री होतील आणि त्यांच्या चिरंजीवांना राज्यात उपमुख्यमंत्रिपद दिलं जाईल. पण, मुख्यमंत्री हा भाजपाचा असणार आहे."

प्रतिक्रिया देताना रोहित पवार (ETV Bharat Reporter)

मुख्यमंत्रिपदाचा निर्णय दिल्लीत घेतला जातो : "महाराष्ट्र हे राज्य या देशातलं सर्वात विकसित राज्य आहे. जो विकास काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आपल्या विचाराच्या काळामध्ये होत होता, तो विकास कुठेतरी आता कमी झालेला आहे. पण जो कुठला निर्णय पूर्वी घेतला जात होतो, तो महाराष्ट्रामध्येच घेतला जात होता. आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा निर्णय दिल्लीत घेतला जात आहे," असा टोला रोहित पवार यांनी महायुतीला लगावला.

पक्षाला वाटतं आमचा मुख्यमंत्री झाला पाहिजे : महायुतीत फडणवीस यांना विरोध होत आहे का? यावर रोहित पवार म्हणाले की, "दादांच्या पक्षाला असं वाटतं की, दादा मुख्यमंत्री झाले पाहिजेत. आता भाजपामध्ये सुद्धा ४० टक्के लोकांना असं वाटतं की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजे, पण असे काही लोक असतील त्यांना वाटत असेल की, दुसरं कोणीतरी मुख्यमंत्री झाला पाहिजे. त्यामुळं आता ते पुढे कोणाला करतात हे आपल्याला बघावं लागेल. पण आता मेजॉरिटी येऊन सुद्धा तुम्ही दिवस वाया घालवत आहात. महाराष्ट्र वाट बघत आहे की, जे जे आश्वासनं तुम्ही दिली आहेत, ती आश्वासनं पहिल्या दिवसापासून तुम्ही पूर्ण कराल."

हेही वाचा -

  1. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवारांच्या पक्षापेक्षा कमी मते मिळूनही जागा जास्त; नेमका गोंधळ काय?
  2. महाराष्ट्रात फडणवीस नाही तर कोण? वाचा भाजपाचं धक्कातंत्र आहे तरी काय
  3. अंबादास दानवेंच्या विधानानं खळबळ; म्हणाले, "विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा अतिआत्मविश्वास..."

ABOUT THE AUTHOR

...view details