महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

संजय गायकवाड,अनिल बोंडे यांना समर्थन नाही, पण राहुल गांधींनी सांभाळून बोलावं - चंद्रशेखर बावनकुळे - Chandrashekhar Bawankule

Chandrashekhar Bawankule : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आरक्षणाबाबत केलेल्या विधानानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. मात्र, संजय गायकवाड यांच्यानंतर अनिल बोंडे यांचीही टीका करताना जीभ घसरली. याबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Chandrashekhar Bawankule
चंद्रशेखर बावनकुळे (ETV BHARAT Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 18, 2024, 10:37 PM IST

नागपूर Chandrashekhar Bawankule :लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आरक्षण विरोधी असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. एवढंच नाही तर संपूर्ण गांधी कुटुंब आरक्षणविरोधी असल्याचा आरोप त्यांनी केलाय. ते आज नागपूर येथे बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या १०० दिवसाचा लेखाजोखा त्यांनी मांडला, त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

आरक्षणाच्या संदर्भातील राहुल गांधी यांचे विधान अत्यंत गंभीर असून, त्यांच्या पोटातील ओठावर आलं आहे. राहुल गांधी ज्यावेळी महाराष्ट्रात येतील त्यावेळी त्यांना ओबीसी, एसटी समाजातील सर्व एकत्रितपणे आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट करा असं खडसावून विचारू.- चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजपा


योजनांचा फायदा शेतकऱ्यांना होतोय: एमएसपी वाढल्यानं शेतकऱ्यांना फायदा झालाय. शेतकऱ्यांना आधारभूत किंमतीपेक्षा जास्त भाव मिळेल. बासमती तांदूळ, कांदा उत्पादक, यांना फायदा होणार आहे. कर सवलतही दिली आहे. मोठा फायदा मध्यमवर्गीय लोकांना होताना दिसत आहे. सशक्त तरुण योजनेचे काम सुरू झाले आहे. माझी लाडली बहीण योजनेसह अनेक योजना सुरू आहेत, महिलांना रोजगार देण्याचं काम सुरू आहे.

प्रतिक्रिया देताना चंद्रशेखर बावनकुळे (ETV BHARAT Reporter)


संजय गायकवाड, अनिल बोंडे यांना समर्थन नाही : संजय गायकवाड किंवा अनिल बोंडे यांना समर्थन नाही. पण राहुल गांधी यांनी सांभाळून बोललं पाहिजे. नेहरू यांनी आरक्षण विकासाला अडसर असल्याचं म्हटलं होतं. राहुल गांधी यांनी बुद्धीहीन लोकांना आरक्षण मिळते, जे आरक्षण मिळाले ते बुद्धीहीन आहेत का? राहुल गांधी तेच म्हणत आहेत. आम्ही ठरवलं आहे जेव्हा कधी राहुल गांधी महाराष्ट्रात येतील तेव्हा त्यांना आरक्षणावर प्रश्न विचारू, मोदीजींबद्दल ते खोटे बोलले, तुमची भूमिका स्पष्ट करा नंतर बोला, अशी आमची भूमिका असल्याचं बावनकुळे म्हणाले.


मोदी सरकारच्या १०० दिवसांच्या कामाचा लेखाजोखा : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील १०० दिवसातील लेखाजोखा मांडला. लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिलेल्या जाहीरनाम्यामधील बहुतांश कामे मागील १०० दिवसांत मोदी सरकारने पूर्ण केली आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारच्या कामांना जनतेसमोर घेऊन जात आहोत. महाराष्ट्राचा विकास डबल इंजिन सरकारच करेल हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, विमानतळे, मेट्रो, रेल्वे प्रकल्पाला मंजुरी, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा १७ वा हप्ता, २०२४-२५ वर्षांसाठी शेतमालाच्या हमीभावात वाढ, शेतकऱ्यांसाठी १४ हजार २०० कोटींच्या सात मोठ्या योजनांना दिलेली मान्यता सरकारचे हे काम लक्षणीय आहे.

हेहा वाचा -

  1. "यांचं मानसिक संतुलन बिघडलं...", अनिल बोंडेंच्या वक्तव्यावर नेत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया - Anil Bonde Controversial Statement
  2. राहुल गांधींच्‍या जिभेला चटके देण्‍याच्‍या वक्‍तव्‍यावरून काँग्रेस आक्रमक; अमरावती पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल - Anil Bonde Controversial Statement
  3. एक राष्ट्र एक निवडणूक संकल्पनेला मान्यता, कोविंद पॅनेलच्या अहवालाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी - One nation one Election

ABOUT THE AUTHOR

...view details