बेरूत New Leader Of Hamas :इस्रायलच्या सैन्य दलानं हमासचा म्होरक्या इस्माइल हनीयेह याचा 'काटा' काढल्यानंतर हमास संघटना कोलमडणार अशीच अनेकांची धारणा होती. मात्र इस्माइल हनीयेह याच्या नंतर याह्या सिनवार यांनी हमासची सूत्रं हाती घेतली आहेत. याह्या सिन्वार यांना इस्रायलवरील ऑक्टोबर हल्ल्याचे मास्टरमाईंड मानलं जाते. त्यांचं पूर्ण नाव याह्या इब्राहिम हसन सिनवार असं असून त्यांचा जन्म गाझा पट्टीतील खान युनूस निर्वासित छावणीत झाला.
इस्रायलवर झालेल्या ऑक्टोबर हल्ल्याचा मास्टरमाईंड :हमासनं इस्रायलवर 7 ऑक्टोबरला हल्ला केला. या हल्ल्यात इस्रायलमधील तब्बल 1200 पेक्षाही अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्याचा मास्टरमाईंड म्हणून याह्या सिनवार यांची ओळख आहे. हमासचे नवे नेते म्हणून याह्या सिनवार यांची घोषणा करण्यात आली आहे. इराणमध्ये झालेल्या हल्ल्यात इस्माइल हनीयेह यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर हमासचे नवे नेते म्हणून याह्या सिनवार यांची निवड करण्यात आली. इस्माइल हनीयेह यांच्या जोडीनं याह्या सिनवार यांनी हमास संघटनेवर जबरदस्त पकड निर्माण केली आहे.
निर्वासित छावणीत जन्म ते हमास प्रमुख :याह्या सिनवार यांचा जन्म 1962 मध्ये गाझा पट्टीतील खान युनिसच्या एका निर्वासित छावणीत झाला. खान युनिसच्या हे 1987 मध्ये स्थापन झालेल्या हमासच्या सुरुवातीचे सदस्य होता. त्यांनी 12 इस्रायली सैनिकांची हत्या केल्याची कबुली दिल्यामुळे त्यांना इस्रायलनं 1980 च्या उत्तरार्धात अटक केली. या कामगिरीमुळे त्यांना द बुचर ऑफ खान युनिस असं टोपणनाव मिळालं. इस्रायली सैनिकांच्या हत्या केल्यानं त्यांनाचार जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यामुळे निर्वासित छावणीत जन्मलेल्या मुलानं थेट हमासच्या प्रमुख पदावर कब्जा केला.
याह्या सिनवार बनले तुरुंगातील नेता :तरुंगात असताना कामाची परिस्थिती सुधारण्यासाठी याह्या सिनवार यांनी तुरुंगात संप घडवून आणला. त्यामुळे तरुंगातील बंदीवानांचे ते नेते बनले. यावेळी त्यांनी हिब्रू आणि इस्रायली समाजाचाही अभ्यास केला. 2008 मध्ये याह्या सिनवार यांना मेंदूचा कर्करोग झाला. मात्र इस्रायली डॉक्टरांनी उपचार केल्यामुळे ते मेंदूच्या कर्करोगातून बचावले.