महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / international

हमासच्या दहशतवाद्यांना आदेश देणाऱ्या हमासच्या नेत्याचा खात्मा, इस्त्रायलकडून प्रथमच पुष्टी - Mohammed Deif killed - MOHAMMED DEIF KILLED

Mohammed Deif killed : आयडीएफच्या (इस्त्रायली सैन्य) लढाऊ विमानांनी खान युनिस परिसरात 13 जुलैला हल्ला केला होता. या हल्ल्यात हमासच्या नेता मोहम्मद देईफ ठार झाल्याची इस्त्रायली सैन्यानं पुष्टी केलीय.

Mohammed Deif
मोहम्मद देईफ (ETV BHARAT National Desk)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 1, 2024, 8:42 PM IST

जेरुसलेम Mohammed Deif killed :हमासच्या सैन्यदलाच्या विंगचा नेता मोहम्मद देईफ गेल्या महिन्यात गाझाच्या दक्षिणेकडील खान युनिस भागात झालेल्या हल्ल्यात ठार झाल्याचं इस्रायललनं जाहीर केलंय. तेहरानमध्ये हमास प्रमुख इस्माईल हनीयेह यांच्या हत्येच्या एका दिवसानंतर सैन्यानं देईफला ठार केल्याचं अधिकृतपणे जाहीर केले. “आयडीएफनं (इस्त्रायली सैन्य) घोषणा केली की 13 जुलै 2024 रोजी खान युनिसच्या परिसरात IDF लढाऊ विमानांनी हल्ला केला होता. त्यावेळी मोहम्मद देईफ हल्ल्यात ठार झाला.

आंतरराष्ट्रीय दहशतवाद्याच्या यादीत समावेश :सैन्यानं दक्षिण इस्रायलवर हमासच्या हल्ल्याबद्दल सांगितलं, की इस्रायलच्या हल्ल्यात 11 हजार 97 लोक मारले गेले आहेत. हमास संचालित गाझामधील आरोग्य अधिकाऱ्यांनी 13 जुलैच्या स्ट्राइकच्यावेळी 90 पेक्षा जास्त लोक मारले गेल्याचा दावा केला होता. परंतु देईफ त्यांच्यापैकी एक असल्याचा इन्कार हमासनं केला होता. हमासची सशस्त्र शाखा, इज्जेदिन अल-कसाम ब्रिगेडचा प्रमुख, देईफ हा इस्रायलमध्ये होता. जवळपास तीन दशकांपासून मोस्ट वॉन्टेड म्हणून त्याचा आंतरराष्ट्रीय दहशतवाद्याच्या यादीत समावेश होता.

सैन्यदलाच्या मोहिमेमध्ये 39 हजार 480 लोक ठार :देईफनं गेल्या काही वर्षांत इस्रायलवर अनेक हल्ले केले आहे, असा दावा इराणच्या सैन्यदलानं केलाय. गाझामधील हमासचा प्रमुख याह्या सिनवार याच्यासोबत देईफनं काम केलं, असं सैन्यदलानं सांगितलं. "युद्धादरम्यान, त्यानं हमासच्या वरिष्ठ सदस्यांना आदेश जारी करून गाझा पट्टीमध्ये हमासच्या दहशतवाद्यांना कारवायांचे आदेश दिले," असं त्यांनी म्हटलं आहे. हमासच्या हल्ल्यादरम्यान दहशतवाद्यांनी 251 लोकांना ताब्यात घेतलं होतं. त्यातील 111 जण अजूनही गाझामध्ये बंदिवान आहेत. त्यातील 39 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तेव्हापासून इस्रायलच्या सैन्यदलाच्या मोहिमेमध्ये 39 हजार 480 लोक ठार झाले आहेत.

हे वाचलंत का :

  1. हमासचा म्होरक्या टिपला; इस्राईलनं इस्माइल हनीयेहला घरात घुसून 'ठोकलं', अंगरक्षकाचाही खात्मा - Ismail Haniyeh Killed In Tehran
  2. इस्रायल हमास युद्ध : आंतरराष्ट्रीय न्यायालयानं गाझात होणारा नरसंहार थांबवण्याचे दिले आदेश - Israel Hamas War
  3. इस्रायल-हमास संघर्ष कायमचा संपुष्टात येणार? संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं युद्धबंदीचा ठराव केला मंजूर - Gaza ceasefire

ABOUT THE AUTHOR

...view details