Constipation Symptoms Prevention : बद्धकोष्ठता ही आजकाल सामान्य समस्या आहे. याला इंग्रजीत कॉन्स्टिपेशन म्हणतात. वयस्कर लोकांमध्ये बद्धकोष्ठतेचं प्रमाण अधिक आढळतं. वेळोवेळी होणाऱ्या आहारातील बदलांमुळे अनेकांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. बद्धकोष्ठतेनं ग्रस्त लोकांना शौचास त्रास होतो. दरम्यान उच्च रक्तदाब आणि संधिवातासारख्या इतर समस्या उद्भवण्याची भिती असते. या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी आयुर्वेदिक चिकित्सक डॉ. एम. राज्यलक्ष्मी यांनी काही सोपे घरगुती उपाय सांगितले आहेत. त्याआधी मधुमेह आणि बद्धकोष्ठतेचा संबंध जाणून घेऊया.
- मधुमेह आणि बद्धकोष्ठता यांचा काय संबंध आहे?मधुमेहामुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे बद्धकोष्ठता होऊ शकते. मधुमेहामुळे रक्तातील साखरेची पातळी सतत वाढते. ज्यामुळे रक्तवाहिण्या खराब होतात आणि बद्धकोष्ठता उद्भवते.
बद्धकोष्ठतेची लक्षणं
- कडक किंवा कठीण मल
- सतत तो भाग ताणणं
- शौच अपूर्ण झाल्यासारखं वाटणं
- दर आठवडयात तील पेक्षा कमी शौचाला होणं
- विष्ठेचा अभाव
बद्धकोष्ठता कशामुळे होते? वृद्धांमध्ये उद्भवणाऱ्या बऱ्याच सामान्य वैद्यकीय परिस्थिती आणि औषधांमुळे देखील बद्धकोष्ठता होऊ शकते. याची काही कारणं पुढीलप्रमाणे आहेत.
- वैद्यकीय परिस्थिती
- स्ट्रोक, पार्किन्सन रोग किंवा पाठीच्या कण्याला दुखापत झाल्यामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते.
- फायबरयुक्त पदार्थ न खाणे.
- पुरेसं पाणी न प्यायल्यास.
- व्यायाम न केल्यामुळे.
- अनियमित प्रवास, खाणं किंवा झोपणं यासारख्या दिनचर्येतील बदलांमुळे बद्धकोष्ठता होऊ शकते.
- मधुमेहामुळे बद्धकोष्ठता देखील होऊ शकते.
- बैठी जीवनशैली
- अनियमित जेवण
- अधिक कॉफी आणि चहा पिणे
- मद्यपान आणि धूम्रपान
- चिंता आणि तणाव
बद्धकोष्ठतेला सामोरं जाण्याचे उपाय: डॉ. राजलक्ष्मी यांनी बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यासाठी काही घरगुती उपाय सांगितले आहेत, ते पुढीलप्रमाणे
- 100 मिली कोमट दुधात 2 चमचे तूप मिसळा आणि झोपण्यापूर्वी प्या.
- बद्धकोष्ठता बरी होईपर्यंत रोज 2 चमचे एरंडेल तेल रिकाम्या पोटी सेवन करा.
- 1/2 चमचे बडीशेप 100 मिली कोमट पाण्यात दिवसातून दोनदा मिसळा आणि जेवणाच्या 1 तास आधी किंवा नंतर सेवन करा.
- कोमट पाण्यात 1-2 चमचे इसबगोल पावडर मिसळा आणि झोपण्यापूर्वी सेवन करा.
- 100 मिली कोमट पाण्यात 1 चमचा त्रिफळा पावडर मिसळा आणि झोपण्यापूर्वी प्या.
- 2-4 अंजीर एक ग्लास पाण्यात 4 तास भिजवून ठेवा सकाळी उपाशी पोटी त्याचं सेवन करा.
- 20 मनुके एका ग्लास पाण्यात 12 तास भिजवून सेवन करा. मधुमेही रुग्णांनी मनुका खावू नये.
- जीवनशैलीत बदल करा
- दररोज सकाळी 30-45 मिनिटे चाला.
- झोपेतून उठल्यानंतर रिकाम्या पोटी २ ग्लास कोमट पाणी प्या.
- आपल्या आहारात हंगामी आणि फायबर समृद्ध हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश करा.
- दररोज किमान 8-10 ग्लास पाणी प्या.
- जेवताना पाणी पिऊ नये. आवश्यकतेनुसार सिप करा.
- जेवणानंतर 30 मिनिटांनी एक ग्लास कोमट पाणी प्या.
- जेवणानंतर लगेच किमान 100 पावलं चाला.
- जेवल्यानंतर 5-10 मिनिटे वज्रासन करावं.
- तळलेले पदार्थ, मिठाई आणि सोडा पेय घेणं टाळा.
- ध्यान आणि प्राणायामाद्वारे तणाव आणि चिंता दूर करा.
- बद्धकोष्ठतेवर उपचार: बद्धकोष्ठतेच्या अनेक प्रकरणांवर घरी उपचार करता येतात. बद्धकोष्ठता टाळण्यासाठी खालील पद्धती वापरून पहा.
- हे पदार्थ खा: ताजी फळं आणि भाज्या, तसंच संपूर्ण धान्य आणि ब्रेड यांसारखे फायबरयुक्त पदार्थ तुमच्या आहारात समाविष्ट करा. सफरचंद, ब्लूबेरी, बेरी, केळी, हिरव्या पालेभाज्या, ब्रोकोली, फ्लॉवर, बीन्स, भोपळा, गहू, बार्ली, तपकिरी तांदूळ, नट आणि बिया खा.
- पाणी प्या: भरपूर पाणी पिण्याचा प्रयत्न करा. खूप कमी पाणी पिल्यानं बद्धकोष्ठता वाढू शकते. पुरेसे पाणी, रस आणि इतर द्रवपदार्थ प्यायल्यानं आतड्याची नियमित हालचाल होण्यास मदत होईल.
- व्यायाम:दररोज थोडा व्यायाम केल्यास पचनक्रिया सुधारते. तुम्हाला हालचाल आणि सक्रिय ठेवणाऱ्या गोष्टी करा. उदाहरणार्थ फिरायला जा.