Uttarakhand Tour Packages:अनेकांना नवनवीन ठिकाणं एक्सप्लोर करण्याची आवड असते. परंतु फिरायचं प्लानिंग करताना सर्वात आधी पडणारा प्रश्न म्हणजे बजेट. तुम्हीदेखील बजेटचा विचार करत आहात काय? परंतु आता काळजी करू नका. कारण, तुम्ही फारच रास्त बजेटमध्ये गुलाबी थंडीत फिरण्याचा आस्वाद घेवू शकता. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने अशा लोकांसाठी एक अप्रतिम पॅकेज आणलं आहे. यामध्ये आध्यात्मिक आणि प्रेक्षणीय स्थळ पाहण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. जाणून घ्या पॅकेज कधी सुरु होईल आणि लागणारा खर्च.
IRCTC ने उत्तराखंडचा ग्रीन ट्रँगल नावाचं पॅकेज आणलं आहे . या दौऱ्याचा एकूण कालावधी 7 रात्री आणि 8 दिवसांचा आहे. हे पॅकेज हैदराबादहून सुरु होईल. यावेळी तुम्हाला नैनिताल, अल्मोरा, मुक्तेश्वर, दिल्ली या ठिकाणांना भेट देता येईल. प्रवासाचा तपशील खालीलप्रमाणे.
- पहिल्या दिवशी सकाळी ६ वाजता हैदराबादहून ट्रेननं (क्र. १२७२३) प्रवास सुरू होईल. दिवसभराचा प्रवास असेल.
- दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता तुम्ही दिल्ली पोहचणार. पिकअप पॉइंट वरून हॉटेल गाठा. तिथे फ्रेश होऊन नाश्ता करा. त्यानंतर टीम तुम्हाला जीम कॉर्बेट नॅशनल पार्क येथे घेऊन जाईल. यानंतर हॉटेलमध्ये चेक इन करा. रात्रभर तेथेच मुक्काम.
- तिसऱ्या दिवशी नाश्ता केल्यानंतर सफारी आणि कॉर्बेट वॉटरफॉल्सला भेट दिली जाईल. त्यांतर नैनितालचा प्रवास सुरु होईल. नैनिताल पोहचल्यानंतर हॉटेलमध्ये चेक इन करा आणि रात्री तिथेच थांबा.
- चौथ्या दिवशी नैनितालमधील पर्यटन स्थळांना भेट द्या. रात्री नैनितालमध्ये स्टे करावं लागेल.
- पाचव्या दिवशी अल्मोडा आणि मुक्तेश्वरला भेट दिली जाईल. त्या रात्रीही नैनितालमध्येच मुक्काम असेल.
- सहाव्या दिवशी, हॉटेलमधून चेक आउट करा आणि दिल्लीला निघा. तेथे पोहोचल्यानंतर अक्षरधाम मंदिराला भेट दिली जाईल. त्या रात्री दिल्ली येथे मुक्काम असेल.
- सातव्या दिवशी, हॉटेलमधून चेक आउट करा आणि कुतुबमिनार आणि लोटस टेंपलला भेट दिली जाईल . त्यानंतर तुम्हाला दिल्ली रेल्वे स्थानकावर सोडण्यात येईल. तेथून दुपारी चार वाजता दिल्लीहून रेल्वे प्रवास सुरू होईल. संपूर्ण रात्रीचा प्रवास असेल.
- आठव्या दिवशी सायंकाळी ५ वाजता हैदराबादला पोहोचून दौरा समाप्त.
- तिकिट दर आणि इतर तपशील
- 1 ते 3 प्रवासी:कम्फर्ट (3A) मध्ये तुम्हाला सिंगल शेअरिंगसाठी रु.60,910, डबल शेअरिंगसाठी रु.34,480 आणि ट्रिपल शेअरिंगसाठी रु.27,020 द्यावे लागतील. 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसाठी, त्यांच्याकडे बेड असल्यास 19,960 रुपये आणि आउट बेड असल्यास 18,440 रुपये द्यावे लागतील.स्टँडर्ड (SL) मध्ये तुम्हाला सिंगल शेअरिंगसाठी रु.58,220, डबल शेअरिंगसाठी रु.31,630 आणि ट्रिपल शेअरिंगसाठी रु.24,120 द्यावे लागतील. 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसाठी, त्यांच्याकडे बेड असल्यास रू. 16,970 आणि त्यांच्याकडे आउट बेड असल्यास रू. 15,440 द्यावे लागतील.
- 4 ते 6 प्रवाशांसाठी: कम्फर्ट (3A) मध्ये दुहेरी शेअरिंगसाठी रु.29,730 आणि ट्रिपल ऑक्युपन्सीसाठी रु.25,530 द्यावे लागतील. 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसाठी, त्यांच्याकडे बेड असल्यास 19,960 रुपये आणि आउट बेड असल्यास 18,440 रुपये द्यावे लागतील. स्टँडर्ड (SL) दुहेरी वहिवाटीसाठी रु.26,870 आणि तिहेरी शेअरिंगसाठी रु.22,640. 5 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसाठी, त्यांच्याकडे बेड असल्यास रू. 16,970 आणि त्यांच्याकडे बेड असल्यास रू. 15,440 द्यावे लागतील.
- पॅकेजमध्ये हे समाविष्ट आहे
- ट्रेनची तिकिटे
- हॉटेल निवास
- 6 नाश्ता
- पॅकेजनुसार साइट पाहण्यासाठी वाहन
- प्रवास विमा
- सध्या हे पॅकेज १२ नोव्हेंबर रोजी उपलब्ध आहे. इतर तारखाही आहेत.
- या पॅकेजची संपूर्ण माहिती, पॅकेज बुकिंगसाठी या लिंकवर क्लिक करा