हैदराबाद Symptoms Before A Heart Attack :धकाधकीच्या जीवनशैलीमुळे हृदय विकाराच्या रूग्णांमध्ये झपाट्यानं वाढ होत आहे. त्यामागं लठ्ठपना, उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, मधुमेह इत्यादी कारणं असू शकतात. परंतु तज्ज्ञांच्या मते हृदयविकाराचा झटका येण्याआधी किमान 10 दिवस ते एक महिन्या पूर्वीपासूनंच त्याची लक्षणं दिसू लागतात. या लक्षणांकडे लक्ष दिल्यास हृदयविकाराचा झटका टाळता येवू शकतो. हृदविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीरात कोणती सात मुख्य लक्षणं दिसतात ते पाहूया.
- थकवा : डॉक्टर मते, हृदयविकाराच्या झटक्यापूर्वी 10 दिवस ते एक महिना पूर्वीच शरीर थकल्यासारखं वाटतं. नॅशनल हार्ट, लंग आणि ब्लड इन्स्टिट्यूटनं प्रसिद्ध केलेल्या 2019 च्या अहवालानुसार हे लक्षणं पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये अधिक सामान्य आहे.
- छातीत दुखणे :छातीमध्ये सतत वेदना किंवा जडपणा वाटत असेल. तसंच छातीच्या डाव्या बाजूस तीव्र वेदना जाणवत असतील तर हे हृदयविकाराच्या झटक्याचे प्रारंभिक लक्षण आहे. तुम्हाला छातीत दुखल्यासारखं किंवा जडपणा जाणवत असेल तर याकडं चुकूनही दुर्लक्ष करू नका. वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.
- घाम येणे : शरीराला घाम येणे सामान्य आहे. परंतु बसताना, खाताना, झोपताना भरपूर घाम येत असेल तर वेळीच सावध व्हा. हृदयाच्या नसा ब्लॉक असल्यास देखील जास्त घाम येऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, हृदविकाराचा झटका येण्यापूर्वी अनेक लोकांना पचनासंबंधित समस्या आणि मळमळ देखील जाणवते.
- श्वासोच्छवासाचा त्रास :श्वास घेण्यास त्रास होत असेल तर हे हृदयविकाराच्या झटक्याचं लक्षण असू शकते.
- हृदय ठोका वाढणे : जेव्हा हृदयाला पुरेसं रक्त मिळत नाही, तेव्हा हृदयाची गती सामान्यपेक्षा जास्त असते. तुमच्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये काही काळ बदल जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करणं हे घातक ठरू शकतं. हृदय विकाराच्या झटक्याचं हेही एक लक्षण आहे.
- शरीर दुखणे :शरीर दुखणं हे हृदविकाराचा झटका येण्यामागील एक प्रमुख लक्षण आहे. हृदयविकाराचा झटका येण्याआधी बहुतेक रुग्णांना छाती, खांदे, हात, पाठ, मान आणि जबड्यात वेदना होतात.
- चक्कर येणे : डॉक्टरांच्या मते, तुम्हाला वेळोवेळी विनाकारण चक्कर येत असेल तर त्याकडं दुर्लक्ष करू नका. चक्कर येणं, डोकेदुखी, छातीत दुखणं आणि रक्तदाब कमी होणं ही हृदयविकाराची लक्षणं असू शकतात.
अधिक माहितीकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
https://www.nih.gov/news-events/nih-research-matters/heart-attack-symptoms-women