Navratri Festival 2024: गुरुवार 3 ॲाक्टोबर पासून नवरात्र सुरू होत आहेत. दरम्यान मातेच्या 9 रुपांची पुजा केली जाणार. यावेळी घरोघरी घटस्थापना करून अखंड ज्योत पेटवली जाते. नवरात्रीचे 9 दिवस अत्यंत पवित्र असून हा उत्सव मोठ्या उत्साहात साजारा केला जातो. नवरात्रीमध्ये अनेक लोक कडक उपावास करतात. या नऊ दिवसात आराधना करताना काही नियमांचे काटेकोर पालन करावे. जेणेकरून या दिवसात केलेल्या उपवासांचा अध्यात्मिक फायदा मिळेल. प्रसिद्ध ज्योतिष माचिराजू किरण कुमार यांनी या काळात पाळण्याचे काही नियम सांगितले आहेत. देवीच्या भक्तांनी नऊ दिवस देवीची सेवा करताना या गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात.
नवरात्रीमध्ये या चुका करू नये
- अनेकजण घटस्थापनेच्या दिवशी पूजेचं साहित्य घेऊन येतात. परंतु ही चुकीची पद्धत आहे. ज्योतिशष माचिराजू किरण कुमार याच्या मते, पूजा साहित्य घटस्थापनेच्या आदल्या दिवशी म्हणजेच 2 ऑक्टोबरला सायंकाळपर्यंत घरी आणून ठेवावं.
- नवरात्रीच्या काळात थंड पाण्याने अंघोळ करावी. ज्यांना थंड पाण्यानं अंघोळ जमत नसेल त्यांनी कोमट पाण्यानं अंघोळ करावी.
- नवरात्रीच्या काळात केस आणि नखे कापू नये.
- नवरात्रीच्या नऊ दिवसात चामड्याच्या वस्तूंचा वापर टाळावा.
- व्रत करणाऱ्या व्यक्तींनी ब्रह्यचर्य पाळावे.
- उपवास करणाऱ्या व्यक्तीनं मांस, दारू आणि तामसिक पदार्थांचं सेवन टाळावं.
- भक्तांनी नवरात्रीत मासिक पाळीच्या महिलांना हात लावू नये.
- महिलांनी दाराजवळ बसून केस विंचरू नयेत.
- व्रत करणाऱ्यांनी व्रत मध्यंतरी मोडू नये.
- नवरात्रीमध्ये देवीची पूजा करणाऱ्या भाविकांनी कांदा, लसूण आणि दही घालून केलेला रायता कोणत्याही परिस्थितीत खाऊ नये. ज्योतिषी मच्छिराजू किरण कुमार यांच्या मते, या नियमांचे पालन करून पूजा केल्यास तुम्हाला पूर्ण कृपा प्राप्त होईल.