Navratri Day 3 Colour :आज नवरात्रीचा तिसरा दिवस असून हा दिवस चंद्रघण्टा देवीला समर्पित असतो. चंद्रघण्टा मातेच्या पुजनानं जीवनात यश मिळतं. मातेच्या मस्तकावर घंटेच्या आकाराची चंद्रकोर असल्यामुळं या देवीला चंद्रघण्टा देवी म्हणून ओळखलं जातं. आजच्या दिवशी करडा म्हणजेच 'ग्रे' रंगाला विशेष महत्त्व असतं. ग्रे रंग तुमच्यावर अधिक खुलून दिसावा म्हणून बॉलिवूड सेलिब्रिंटीशी इन्स्पायर होऊन आम्ही काही टिप्स तुम्हाला देत आहोत.
- काजल अग्रवालचा ग्रे साडी लूक : जर तुम्ही नवरात्रीत आकर्षक लूक शोधत असाल तर तुम्ही काजल अग्रवाल सारख्या राखाडी साड्यांसोबत झुमके घालू शकता.
- आलिया भट्टचा लूक :नवरात्रीत हलके किंवा आरामदायक कपडे घालणं अनेकांना आवडतं. अभिनेत्री आलिया भट्टनं परिधान केलेली ही ग्रे रंगाची साडी नवरात्रीदरम्यान तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकते. तुमच्याकडे देखील ग्रे रंगाची साडी असल्यास तुम्ही अशा पद्धतीनं घालू शकता.
- माधुरी दीक्षितचा शर्ट आणि पँट लूक: न्यूड मेकअपसह अभिनेत्री माधुरी दीक्षितचा शर्ट आणि पँट हा या नवरात्रीत परिधान करण्याचा एक वेगळा पर्याय असू शकतो. या नवरात्रीला तुम्ही या शर्ट आणि पॅन्टमध्ये माधुरी दीक्षितचा लूक फॉलो करू शकता.
- परिणीती चोप्राचा सिल्क साडी लूक: नवीन नवरीसाठी हे पहिले नवरात्र असेल, किंवा तुम्ही रॉयल लुक शोधत असाल तर, दुपट्टा, चुडा आणि सेंडूसह या ग्रे रंगाच्या सिल्क साडीमध्ये परिणिती चोप्रानं परिधान केलेला हा लुक तुम्ही फॉलो करू शकता.
- मलायका अरोराचा क्लासी साडी लूक :मलायका अरोराच्या गळ्यात असलेली ज्वेलरी आणि क्लासी ग्रे साडी नवरात्रीत घालण्याचा एक चांगला पर्याय असू शकतो.
- तारा चुतारिया जॉर्जेटचा लूक: तारा चुटारियाने नेसलेली ही ग्रे रंगाची जॉर्जेट सिक्वीन्स बॉलिवूड साडी नवरात्रीला अतिशय आकर्षक दिसेल. तुमच्याकडे देखील अशी साडी असल्यास तुम्ही परिधाण करा.