महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

कोरोनानंतर हृदयरोगाच्या रुग्णांमध्ये वाढ, रुग्णांमध्ये तरुणांची संख्या अधिक - COVID NEW VARIANT

तरुण पिढीतील हृदयविकाराची वाढती समस्या चिंताजनक असून, तरुणांनी मानसिक आरोग्य आणि आपल्या जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे.

heart disease patients
हृदयरोगाच्या रुग्णांमध्ये वाढ (ETV Bharat File Photo)

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 21, 2024, 8:54 PM IST

मुंबई :कोरोनामुळे लोकांचं आयुष्य बदललं, असं आपण नेहमीच म्हणतो. कोरोनानंतर दैनंदिन जीवनात अनेक बदल झाले असून, आरोग्यावर घातक परिणाम झालाय. मात्र, हे परिणाम नेमकं काय? आपल्या आरोग्यावर नेमके कोणते परिणाम झाले? याबाबतचे सर्वेक्षण मुंबईतील वोकहार्ट रुग्णालयाने केलंय. या रुग्णालयाने नोंदवलेल्या निरीक्षणानुसार, कोरोनानंतर तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचे निदर्शनास आले असून, यासाठी कोरोनानंतर तरुणांची बदललेली जीवनशैली, वाढलेली व्यसनाधीनता आणि हायपर टेन्शन ही तीन मुख्य कारणं असल्याचे वोकहार्ट या रुग्णालयाने म्हटलंय.

आजारांमध्ये चिंताजनक वाढ झाल्याचे समोर :या सर्वेक्षणाबाबत वोकहार्ट रुग्णालयाचे इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. परीन सांगोई यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयाने मागील तीन वर्षांत हृदयविकाराने ग्रासलेल्या अनेक तरुण रुग्णांवर उपचार केलेत. उपचारादरम्यान तज्ज्ञ डॉक्टरांनी काही निरीक्षणे नोंदवलीत. या निरीक्षणातून असं निदर्शनास आलं की, यातून तरुणांमध्ये हृदयाशी संबंधित आजारांमध्ये चिंताजनक वाढ झाल्याचे समोर आलंय. रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार, मागील तीन वर्षांत हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांचे 29, 34 व 36 अशा वयोगटात वर्गीकरण करण्यात आलेत. प्रत्येक वयोगटात हृदयविकाराची कारणं अन् स्थिती साधारण काही प्रमाणात वेगळी असल्याचं डॉक्टरांचं निरीक्षण आहे.

लठ्ठपणा जैविक वृद्धत्व वाढवू शकते :मिळालेल्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वीच ओमकार वाघधरे या 29 वर्षीय तरुणावर उपचार करण्यात आलेत. ओमकारवर उपचारादरम्यान तज्ज्ञ डॉक्टरांच्या असे निदर्शनाखाली की, लठ्ठपणा आणि हायपर टेन्शन याबरोबरच व्यवसायातील नुकसानीमुळे वाढलेला मानसिक ताण हे त्याच्या हृदयविकारामागचे कारण होते. सदर रुग्णाचे वजन 105 किलो आहे. त्याच्या या सवयी आणि वजनामुळे त्याच्या शरीरात 95 टक्के ब्लॉकेज आढळले. डॉ. सांगोई यांनी सांगितले की, तरुणांमधील ताण आणि लठ्ठपणा जैविक वृद्धत्व वाढवू शकते. यामुळे अशा व्यक्ती हृदयविकारांना त्वरित बळी पडतात.

जीवनशैलीत बदल करणे गरजेचे :तरुण पिढीतील हृदयविकाराची वाढती समस्या चिंताजनक असून, तरुणांनी मानसिक आरोग्य आणि आपल्या जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे. आरोग्यदायी जीवनशैलीसाठी पावले उचलली पाहिजेत. याबाबत जनजागृती करणे गरजेचे असून, तरुणांनी आरोग्याला प्राधान्य द्यायला हवं. तसेच नियमित तपासण्या करणंदेखील गरजेचे असल्याचं डॉ. सांगोई यांनी म्हटलंय. ज्यांच्या कामाच्या ठिकाणी तणावाचे वातावरण आहे किंवा ज्या रुग्णांना हायपर टेन्शनचा त्रास आहे, अशा रुग्णांनी नियमित आरोग्य तपासण्यांना प्राधान्य द्यायला हवे, असेदेखील रुग्णालयाने म्हटलंय.

हेही वाचा...

  1. " जागावाटप उद्या होणार, महाविकास आघाडीपेक्षा महायुती..."-नाना पटोले
  2. महाराष्ट्रातील राजकारणात महिलांना दुय्यम स्थान; 'महिलाराज' फक्त नावालाच, जाणून घ्या आकडेवारी

ABOUT THE AUTHOR

...view details