Foods To Fight Pollution: प्रदूषण ही प्रत्येकाच्या आरोग्यावर परिणाम करणारी सर्वात मोठी समस्या आहे. प्रदूषणाचा मानवी विकासावर गंभीर परिणाम होतो. जन्माला येणाऱ्या बाळापासून ते लैंगिक परिपक्वतेपर्यंत तसंच थायरॉईडचं नियमन आणि संप्रेरक पातळीतील बदल अशा विविध मार्गांनी प्रदूषण मानव जातीला त्रात देत आहे. ऑक्सिडेटिव्ह तणाव, अकाली वृद्धत्व, सांधेदुखी आणि जळजळ यासारख्या अनेक समस्यांचं मूळ कारण प्रदूषण आहे. प्रदूषणाचा सर्वात जास्त परिणाम फुफ्फुसांवर होतो. परंतु आता तुम्हाला काळजी करायची काही गरज नाही. कारण, आम्ही तुम्हाला अशा पदार्थांबद्दल माहिती देत आहोत, ज्यामुळे प्रदूषणापासून तुमचा बचाव होवू शकतो.
- बेरी:बेरीमध्ये मुबलक प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात. स्टॉबेरी, ब्लूबेरी, रसबेरी यासारख्या बेरीमध्ये अँथोसायनिन्स नावाचं अँटिऑक्सिडेंट पुरेशा प्रमाणात आढळतो. ही संयुगे ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि प्रदूषणामुळे होणाऱ्या हानिकारक मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. आहारात बेरींचा समावेश केल्यास तुमच्या शरीराला नैसर्गिक संरक्षण मिळेल.
- ब्रोकोली: ब्रोकोलीसारख्या क्रूसीफेरस कुटुंबातील भाज्यांमध्ये डिटॉक्सिफायिंग गुणधर्म आढळतात. त्यातील सल्फोराफेन डिटॉक्सिफिकेशन एन्झाइम्सच्या क्रियान्वनासाठी मदत करतं. तसंच प्रदूषक काढून टाकण्यास मदत करतं. हे शरीरात संरक्षणात्मक थर तयार करतात जे आपल्या शरीराला पर्यावरणातील विषारी पदार्थांपासून वाचवतात.
- हळद: हळदीमध्ये कर्क्यूमिन, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट सारखी सक्रिय संयुगे असतात. एका अभ्यासामध्ये असं दिसून आलं की, हे श्वसन प्रणालीवर प्रदूषणाचे परिणाम टाळण्यास मदत करतात. आपल्या आहारात हळद समाविष्ट केल्यास प्रदूषणाचे हानिकारक परिणाम कमी होऊ शकतात. तसेच शरीराची लवचिकता सुधारते.
- हिरव्या भाज्या:मेथी आणि पालक आणि इतर हिरव्या भाज्या अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण आहेत. यामुळं प्रदूषणापासून लढण्यासाठी आहारात हिरव्या भाज्यांचं समावेश असणं गरजेच आहे. त्यातील जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स एकूणच आरोग्य सुधारतात. आपल्या दैनंदिन आहारात यांचा समावेश केल्यास प्रदूषकांचा प्रभाव कमी होऊ शकतो.
- फॅटी फिश:सॅल्मन, मॅकेरल आणि सार्डिन यांसारख्या फॅटी फिशमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असतं. या फॅट्समध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. हे प्रदूषणामुळं होणारे दाहक प्रतिसाद आहेत. ओमेगा -3 समृद्ध माशांचें नियमित सेवन केल्यानं शरीरावरील प्रदूषणाचा प्रभाव कमी होतो आणि हृदयाचं आरोग्य सुधारतं.
संदर्भ