Heart Attack: पावसाळा संपल्यानंतर आता हिवाळ्याची चाहूल लागली आहे. अशात फ्लू, खोकला, दमा आणि तापासारख्या आजारांचा धोका जास्त असतो. तसचं हिवळ्यामध्ये हार्ट अटॅक आणि उच्च रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. दरम्यान शरीर उबदार असणं आवश्यक असतं. त्यासाठी सकस आहार घेणं गरजेचं आहे. शरीर उबदार ठेवण्यासाठी अन्नातील पोषक घटक महत्वपूर्ण भूमिका बजावतात. हिवाळ्यात काही ड्राय फ्रुटचा समावेश तुम्ही तुमच्या आहारात केल्यास आजारांचा धोका कमी होवू शकतो. बदाम, काजू, पिस्ता, अक्रोड, अंजीर आणि मनुका योग्य प्रमाणात खाल्ल्यास हृदयाचं आरोग्य सुधारू शकतं.
- बदाम:बदामामध्ये मॅग्नेशियम पुरेशा प्रमाणात आहे. बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी मॅग्नेशियम महत्त्वाची भूमिका बजावतो. यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो. तसंच बदाम ओमेगा 3 फॅटी अॅसिडचा चांगला स्त्रोत आहे. कोलेस्ट्रोल कमी करण्यासाठी हे उपयुक्त आहे. शियाय रक्त पातळ करण्यासाठी हे मदत करतं. यामुळं हृदयाचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. तसंच बदामात फायबर, प्रथिनं, निरोगी चरबी, जीवनसत्त्वं आणि अॅंटिऑक्सिडंट्स असतात. फुफ्फुसाचा कर्करोग टाळण्यासाठी बदाम उत्तम आहे.
- अक्रोड :अक्रोड हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये पॉलीअनसेचुरेटेड आणि मोनोअनसेचुरेटेड फॅटी अॅसिड सारखे पोषण घटक असतात. तसंच यामध्ये जीनसत्व ई मुबलक प्रमाणात आढळतात. यामुळे हृदय निरोगी राहते. तसंच केसांसाठी आणि त्वचेसाठी अक्रोड उत्तम आहेत. हिवाळ्यामध्ये अक्रोड खाल्ल्यास शरीर उबदार ठेवण्यासाठी मदत होते.
- पिस्ता:पिस्ता हे अतिशय चवदार ड्राय फ्रूट आहे. यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, पोटॅशियम, फॉस्फरस आणि तांबे यासारखे पोषक घटक असतात. त्याचबरोबर यात मुबलक प्रमाणात अँटिऑक्सिडंट्सचा आढळतात. नियमित पिस्ता खाल्लास हृदविकाराच झटका आणि स्ट्रोक सारख्या समस्येचा धोका कमी करता येतो. त्याचबरोबर यात असलेल्या पोटॅशियममुळे रक्तदाब कंट्रोलमध्ये राहतं. हृदय निरोगी ठेवण्यासाठी पिस्ता महत्त्वाची भूमिका बजावते.
- अंजीर: हिवाळ्यात अंजीराचं सेवन केल्यास शरीर उबदार ठेवण्यास मदत होते. अंजीरामध्ये फायबर आणि पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते. यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.
संदर्भ