महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

केसांचं आरोग्य चांगलं ठेवायचं आहे? आजच तयार करा ‘हे’ लाडू - How To Prepare Moringa Powder Ladoo

How To Prepare Moringa Powder Ladoo: हिवळ्यामध्ये केस गळतीच्या समस्येनं महिला त्रस्त असतात. केस गळती थांबवण्याकरिता त्या विविध उपाय करतात. महागडे प्रोडक्ट वापरून सुद्धा केस गळती आणि नखं कोरडे होणे यासारख्या समस्यांवर तोळगा निघत नाही. परंतु आज आम्ही तुम्हाला एक अशी रेसिपी सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या केसांचे आरोग्य तसंच नखं निरोगी राहू शकतात.

How To Prepare Moringa Powder Ladoo
शेवग्याचे लाडू (ETV Bharat)

By ETV Bharat Lifestyle Team

Published : Oct 1, 2024, 4:47 PM IST

How To Prepare Moringa Powder Ladoo:बदलत्या जीवनशैलीसोबतच महिलांसमोर अनेक समस्या डोकं काढू लागल्या आहेत. त्यापैकी केस गळती आणि नखं कोरडे होण्याच्या समस्येनं अनेक महिला परेशान आहेत. काहींना आरोग्य आणि अनुवांशिक कारणांमुळे अशा समस्या उद्भवतात. तर काहींना बदलत्या ऋतुचा फटका बसतो. साधारणतः हिवाळ्यामध्ये तर महिलांचे केस जास्त गळू लागतात. प्रसिद्ध पोषणतज्ञ आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर 'सिमरत कथुरिया' यांनी यावर एक उपाय सांगितलं आहे. त्याचा अवलंब केल्यास केस गळतीसह नखांच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. काय आहे तो उपाय, चला जाणून घेऊयात.

मोरिंगा म्हणजेच शेवग्याच्या शेंगांच्या पावडरपासून तयार केलेले लाडू खाल्ल्यास केस गळण्याची समस्या दूर होऊ शकते. हे लाडू केस आणि नखांच्या आरोग्यासाठी चांगले आहेत. यासंबंधी कथुरिया यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. शेवग्याच्या पावडर पासून हेल्थी लाडू कसे तयार करावे ते पाहुयात.

शेवग्याचे लाडू (CANVA)

लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य

भोपळा बिया - 1/3 कप

पिस्ता - 1/3 कप

नारळाचं किस - 2/3 कप

मोरिंगा पावडर - 2 चमचे

वेलची - तीन नग

मनुका - 3/4 कप

कृती :प्रथम एक कढई घ्या. त्यात नारळाचा किस घाला. त्यानंतर पिस्त्याचे दाणे आणि भोपळ्याच्या बिया घाला आणि व्यवस्थित परतून घ्या. त्यानंतर त्यात मनुके आणि वेलची घाला. आता मिक्सरचा जार घ्या आणि त्यात हे मिश्रण घाला. मिश्रणात मोरिंगा पावडर घाला आणि मिक्सिर मधून काढून घ्या. यानंतर तयार झालेल्या या मिश्रणाचे लाडू तयार करा. नियमित एक लाडू खाल्ल्यास चांगला परिणाम होईल.

  • आरोग्यदायी फायदे
  • तज्ज्ञांच्या मते, नारळाच्या किसामध्ये हेल्दी फॅट्स भरपूर असतात. नारळामध्ये व्हिटॅमिन ई पुरेशा प्रमाणात असते. यामुळे केसांची वाढ चांगली होते. यात असलेलं फिनॉलिक अ‍ॅंटिऑक्सिडट्स सारख काम करतं. त्याचबरोबर नारळामध्ये लोहाचं प्रचुर मात्रेत प्रमाण असतं. यामुळे केसांचं आणि नखांचं आरोग्य चांगलं राहतं.
  • तज्ज्ञांचं म्हणणं आहे की पिस्त्यात बायोटिन, व्हिटॅमिन-ई आणि ओमेगा-3 आणि ओमेगा-6 फॅटी ॲसिड्स भरपूर प्रमाणात असतात. असं म्हटले जाते की, ते केसांच्या मुळांना मजबूत करतात आणि केस वाढीस उत्तेजन देतात.
  • बेदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह आणि अँटीऑक्सिडंट असतात.
  • मनुकामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी सोबतच व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, अमिनो ॲसिड, झिंक, कॅल्शियम, लोह, तांबे, पोटॅशियम, सिलिका, मॅग्नेशियम, मँगनीज, ओमेगा-3 आणि ओमेगा-6 फॅटी ॲसिड्स असतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तसंच त्वचा, केस आणि नखं निरोगी ठेवण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. केस गळती रोखण्यासाठी जालीम उपाय; आजपासून फॉलो करा या '7' टिप्स - How To Protect Your Hair At Night
  2. ‘या’ पांढऱ्या विषापासून सावधान! अतिरिक्त सेवनामुळे होवू शकते गंभीर समस्या - How Much Sugar Eat In A Day

ABOUT THE AUTHOR

...view details