Instant Jowar Dosa Recipe: आज प्रत्येक जण हेल्थ कॉशिअस आहे. सकाळचा नाश्तासुद्धा आरोग्यास उपयुक्त ठरेल, अशाच मेन्युचा समावेश आपण न्याहारीत करण्याचा प्रयत्न करतो. त्यातही जवळपास आपण सर्वच साउथ इंडियन पदार्थ खाण्याचे शौकिन आहोत. डोसा हा त्यापैकी एक आहे. आतापर्यंत उडद-मुग डाळ, रवा आणि तांदळापासून तयार केलेला डोसा आपण खाल्ला असेल. पण हाच डोसा आपण वेगळ्या पद्धतीनं तयार केला तर त्यापासून शरीरातील वजन आणि साखर नियंत्रणात ठेवता येऊ शकते.
हा हेल्दी डोसा ज्वारीपासून तयार करता येतो. ज्वारीच्या पिठात २५ टक्के फायबर असतात. हा डोसा खाल्यानंतर दिवसभर पोट भरल्यासरखं तर वाटतंच, सोबत यापासून शरीराला बी-6 जीवनसत्त्व, थायमिन आणि नियासिन सारखे पोषक घटक सुद्धा मिळतात. त्यामुळं मेंदूचं कार्य सुधारण्यास मदत होते. मुलं डोसा आवडीनं खातात. त्याच माध्यमातून तुम्ही मुलांचं सुदृढ आरोग्य राखू शकता. चला तर जाणून घेऊया डोसा तयार करण्याची पद्धत.
- आवश्यक साहित्य
- ज्वारीचं पीठ - १ कप
- तांदळाचं पीठ - चतुर्थांश कप
- रवा - चतुर्थांश कप
- मीठ - चवीनुसार
- जिरं - अर्धा टीस्पून
- आलं - आवश्यकतेनुसार
- हिरवी मिरची - ३
- धणे, किसलेले गाजर - आवश्यकतेनुसार
- पाणी - आवश्यक तेवढे
- तेल - आवश्यकतेनुसार