महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

आला हिवाळा तब्येत सांभाळा ; हिवाळ्यात डिहायड्रेशनपासून वाचण्यासाठी करा 'हे' उपाय, प्रकृती राहील ठणठणीत - DEHYDRATION IN WINTER SEASON

उन्हाळ्यात शरीर डिहायड्रेशन होत असल्यानं अनेकांना त्रास होतो. मात्र हिवाळ्यातही डिहायड्रेशनचा त्रास मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे हिवाळ्यात कशी काळजी घ्यावी, याची माहिती आम्ही देत आहोत.

Dehydration In Winter Season
प्रतिकात्मक छायाचित्र (Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : 6 hours ago

Updated : 5 hours ago

नाशिक : हिवाळ्यात थंड वातावरण असल्यानं घाम येत नाही, त्यामुळे आपल्याला तहान लागत नाही. परिणामी या दिवसात पाणी पिण्याचं प्रमाण कमी असल्यानं डिहायड्रेशन होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे या काळात होणाऱ्या डिहायड्रेशनची कारणं, लक्षणं आणि त्यावर उपाय जाणून घेणं गरजेचं आहे.

डिहायड्रेशन म्हणजे काय ? : सर्वसाधारण डिहायड्रेशन म्हणजे शरीरात पाणी कमतरतेचा त्रास होणं. मात्र हा त्रास आपल्याकडं फक्त उन्हाळ्यात होतो. कारण उन्हाळ्यात घामाद्वारे शरीरातील पाणी बाहेर पडते. यामुळे आपल्याला सतत तहान लागते आणि अशात पुरेसं पाणी पिलं नाही, तर डिहायड्रेशनचा त्रास जाणवतो. पण बऱ्याच जणांना असाच डिहायड्रेशनचा त्रास हिवाळ्यातही होतो. कारण हिवाळ्यात थंड वातावरण असल्यानं घाम येत नाही. त्यामुळे आपल्याला तहान लागत नाही. परिणामी या दिवसात पाणी पिण्याचं प्रमाण कमी होते. जे आपल्या शरीराला जाणवत नाही, पण त्यामुळे शरीराला पुरेसं पाणी न मिळाल्यानं डिहायड्रेशनचा त्रास जाणवतो.

आला हिवाळा तब्येत सांभाळा (Reporter)

कोणती आहेत हिवाळ्यातील डिहायड्रेशनची लक्षणं : हिवाळ्यात बऱ्याचदा आपल्याला कमी तहान लागते, शरीरातील पाणी कमी झाल्यावर थकवा जाणवतो, हिवाळ्यात आपली त्वचा कोरडी दिसू लागते, शरीरातील पाणी कमी झाल्यानंतर चक्कर येते, डिहायड्रेशनमुळे डोकेदुखीचा त्रास जाणवतो, पाण्याच्या कमतरतेमुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो आणि अ‍ॅसिडिटी, पित्ताचा त्रास जाणवतो. डिहायड्रेशनचा गंभीर परिणाम झाल्यास किडनीचे आजार, हृदयविकार आणि मृत्यू सुद्धा ओढवू शकतो.

अशी घ्या काळजी : डिहायड्रेशनचा त्रास होऊ नये, यासाठी दिवसभरात भरपूर पाणी प्यावं, कॉफी, सूप, गरम चहा इत्यादी पिल्यानं तुमचं शरीर गरम तर राहतेच शिवाय हायड्रेटही राहते. हिवाळ्यात भाज्यांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असते. त्यामुळे तुम्ही कलिंगड, काकडी, संत्री, गाजर तसेच इतर फळांचा आहार घेतल्यास फायदा होतो. या दिवसात साखर तसेच मीठ कमी प्रमाणात खावं, यामुळे मधुमेह, बीपीचा त्रास नियंत्रणात राहील.

हेही वाचा :

  1. मधुमेह आणि हृदयाचे आजार टाळण्यासाठी 'या' हिरव्या भाजीचा आहारात करा समावेश
  2. केवळ पचनाच्या समस्यांपासून सुटका नाही तर लैंगिकता सुधारण्यासाठी सर्वोत्तम आहे वेलची
  3. केसांचं आरोग्य चांगलं ठेवायचं आहे? आजच तयार करा ‘हे’ लाडू - How To Prepare Moringa Powder Ladoo
Last Updated : 5 hours ago

ABOUT THE AUTHOR

...view details