Health Benefits Of Flax Seeds:फ्लेकसीड म्हणजेच जवस दिसायला लहान आहे. परंतु त्यात अनेक आश्चर्यकारक गुणधर्म दळलेले आहेत. निरोगी आयुष्यासाठी जवस उपयुक्त असून यात अल्फा लिनोलेनिक अॅसिड, फायबर आणि ओमेगा -3 फॅटी अॅसिड, प्रथिने, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी-6 तसंच अॅटीऑक्सिडंट्स गुणधर्म आहेत. मधुमेहाचे रुग्ण तसंच गरोदर मातांसाठी जवस फायदेशीर ठरू शकतं.
एका अभ्यासातून असं समोर आलं आहे की, जवसाचं सेवन केल्यास वारंवार लागणारी भूक नियंत्रित होण्यास मदत होते. जेवणापूर्वी जवस खाल्ल्यास भूक कमी लागते. यामुळे अन्नातून शरीराद्वारे शोषून घेतलेलं कोलेस्ट्रॉलचे प्रमाण मर्यादित करण्यास देखील उपयुक्त आहे. बद्धकोष्ठता, उच्च कोलेस्टेरॉल, लठ्ठपणा तसंच किडनीतील जळजळ कमी करण्यासाठी जवस उपयुक्त आहे. त्याच बरोबर गरोदर पणामध्ये जवस खाल्ल्यास नैसर्गिक प्रसूती सुद्धा होऊ शकते. परंतु जवसाचं अति सेवन गरोदर महिलांसाठी हानिकारक ठरू शकतं.
- मधुमेहावर रामबाण: जवस मधुमेह नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी आहे. त्यात असलेल्या लिग्नन्समध्ये रक्तातील साखरेचं प्रमाण कमी करण्याची शक्ती आहे. त्यामुळे याचं नियमित सेवन केल्यास मधुमेहाचा धोका कमी होतो. टाइप 2 मधुमेह असलेल्या लोकांसाठीसुद्धा फ्लेक्ससीड चांगलं आहे.
- कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी : जवस हे कोलेस्टेरॉल कमी करणाऱ्या सर्वोत्तम पदार्थांपैकी एक आहे. दररोज 4 चमचे जवसाच्या बिया खाल्ल्यानं खराब कोलेस्ट्रॉल 15 टक्क्यांनी कमी होण्यास मदत होते. त्यामुळे याचा नियमित आहारात समावेश करा.
- बीपी कमी : काही अभ्यासानुसार, जवस खाल्ल्यानं रक्तदाब नियंत्रित केला जाऊ शकतो. दररोज 4 चमचे जवसाच्या बिया खाल्ल्यानं सिस्टोलिक आणि डायस्टोलिक रक्तदाब कमी होतो. यामुळे स्ट्रोक आणि हृदयाशी संबंधित समस्यांची शक्यता कमी होते, असं तज्ञांचं म्हणणे आहे.
- वजन कमी होणं:काही अभ्यासानुसार, फ्लेक्ससीड खाल्ल्यानं वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. यात अविसेलोमध्ये विरघळणारे फायबर असते. पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी जवस फायदेशीर आहे. जवसाच्या सेवनामुळे दिवसभर पोट भरल्यासारखं वाटतं. त्यामुळं आपण जास्त अन्न खाऊ शकत नाहीत. परिणामी वजन सहज कमी होते. काही अभ्यासानुसार, असं आढळून आलं की, जे लोक जवसाचं सेवन करतात ते वजन आणि पोटावरील चरबी सहजपणे कमी करू शकतात.
संदर्भ