महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / health-and-lifestyle

चाणक्य नीती: या ५ प्रकारच्या लोकांपुढे चुकूनही मांडू नका तुमच्या व्यथा - CHANAKYA NITI

चाणक्य नीती मते, तुमच्या मनातील भावना कोणासोबत शेअर करताना अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. कारण इतर कधी आपला विश्वासघात करतील सांगता येत नाही.

CHANAKYA NITI  ACHARYA CHANAKYA
चाणक्य नीती (ETV Bharat)

By ETV Bharat Lifestyle Team

Published : Feb 24, 2025, 7:00 PM IST

Chanakya Niti: आचार्य चाणक्य हे भारतीय इतिहासातील महान आणि प्रभावशाली व्यक्तीमत्व असलेले व्यक्ती होते. त्यांना भारतीय राजकारण आणि नैतिकतेसाठी ओळखलं जातं. त्यांनी मौर्य साम्राज्याच्या स्थापनेत महत्वाची भूमिका बजावली. त्यांच्या कारकिर्दीत मौर्य साम्राज्याचा विस्तार झाला. त्यांनी चाणक्य नीतीद्वारे जीवनाच्या विविध पैलूंविषयी मार्गदर्शन केलं आहे. त्यांना वेद, राजकारण, अर्थशास्त्र, तसंच विविध शास्त्रांचे ज्ञान होते. चाणक्य नीतितून त्यांनी मानवाच्या कल्याणाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

  • थट्टाखोरांपासून दूर रहा: आचार्य चाणक्य यांच्या मते, जे व्यक्ती प्रत्येक गोष्टींची थट्टा करतात आणि ज्यांच्या जीवनात कोणीच महत्वाचं नसतं, अशा व्यक्तींपासून दहा हात दूर रहावं. अशा व्यक्तिंसोबत आपल्या वयक्तीक बाबी शेअर करू नये. कारण, आपल्या त्या गोष्टींची ते केव्हा थट्टा करतील याचा नेम नसतो. त्यामुळे अनेक वेळा आपल्याला मान खाली घालण्याची वेळ येऊ शकते.
  • हेवा करणारे व्यक्ती:आपल्या सभोवताली अनेक जण आपल्या प्रगती आणि यशाचा हेवा करतात. अशा लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना असते. त्यामुळे ते आपल्याला कोणापुढेही खाली लेखण्याची संधी सोडत नाही. अशा व्यक्तिंना आपलं दुखणं कधीच सांगू नये. अशी लोकं ऐन मोक्याच्या वेळी आपला घात करू शकतात.
  • असंवेदनशील व्यक्ती: चाणक्य नीतिनुसार, बरेच लोकांमध्ये भावनांसाठी काहीच संवेदना नसते. आपल्या सोबत असताना ते दुसऱ्यांच्या दुःखावर आनंद साजरा करतात. त्यामुळे तुमच्या गोष्टींना ते दुसऱ्यांकडे सांगून मौज घेऊ शकतात. अशा असंवेदनशील व्यक्तींना आपल्या मनातील कोणत्याच गोष्टी सांगू नये.
  • सर्वांचा मित्र:सर्वांशी मैत्री करू इच्छिणाऱ्या लोकांपासून दूर राहा. असं म्हणतात की, सर्वांचा मित्र हा कोणाचाही मित्र नसतो. म्हणून, अशा लोकांसोबत कधीही तुमचे दुःख शेअर करू नका. कारण ते तुमचे गुपितं सर्वांसोबत शेअर करू शकतात. परिणामी, ते तुमचा विश्वासघात करतील.
  • स्वार्थी लोक:असे बरेच लोक आहेत जे फक्त स्वतःबद्दल विचार करतात आणि इतरांच्या चांगल्या किंवा वाईटाची काळजी करत नाहीत. या प्रकारची व्यक्ती कोणाचीही पर्वा न करता इतरांना इजा करण्याचा विचार करते. चाणक्य नीतिनुसार, त्यांच्याशी कधीही काहीही शेअर करू नये. कारण तो स्वतःशिवाय इतर कोणालाही काहीच समजत नाही.
  • फार बडबडणारी लोकं:असे बरेच लोक आहेत जे काहीही न समजता खूप बोलतात. अशा लोकांपासून दूर राहा. अशांपासून सावध राहणेच चांगले. त्यांच्याशी तुमचे कोणतेही वैयक्तिक दुःख कधीही शेअर करू नका. कारण जर तुम्ही त्यांना चांगल्या गोष्टी सांगितल्या तर ते तुमचा नकारात्मक पद्धतीने विश्वासघात करू शकतात.

ABOUT THE AUTHOR

...view details