मुंबई - Pushpa 2 Vs Chhava : अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित 'पुष्पा 2: द रुल' अपेक्षेप्रमाणे 15 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात दाखल होणार नाही. हा चित्रपट स्वातंत्र्यदिनी रिलीज होणार असल्यामुळं सर्वांच्याच खूप अपेक्षा उंचावल्या होत्या. आता 6 डिसेंबर 2024 रोजी रिलीजसाठी पुन्हा शेड्यूल करण्यात आला आहे. या घोषणेमुळे 'पुष्पा 2' आणि दुसरा आगामी चित्रपट 'छावा' या दोन्ही चित्रपटांची नायिका रश्मिका मंदान्ना हिच्यासाठी अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
'पुष्पा 2' च्या निर्मात्यांनी स्पष्ट केलं की, शूटिगला होत असलेला विलंब आणि त्यानंतरच्या पोस्ट-प्रॉडक्शन कामामुळे रिलीज पुढं ढकलण्यात आलंय. या नवीन रिलीज तारखेसह 'पुष्पा 2' हा चित्रपट 'छावा' या चित्रपटाशी बॉक्स ऑफिसवर टक्कर देणार आहे. 'छावा' या चित्रपटात रश्मिका मंदान्ना आणि विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे. त्यामुळे हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी रिलीज होणार असल्यामुळे रश्मिकाच्या चाहत्यांना चिंतेनं ग्रासलं आहे.
यापूर्वी 'छावा'च्या निर्मात्यांनी रिलीजची तारीख 6 डिसेंबर 2024 अशी असल्याचं जाहीर केली होती. याच तारखेला 'पुष्पा 2' रिलीज होणार असल्याची घोषणा नुकतीच अल्लू अर्जुननं केली आहे. त्यामुळं फिल्म इंडस्ट्रीत अशी चर्चा आहे की हा संघर्ष टाळण्यासाठी 'छावा'चे दिग्दर्शक दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर रिलीजच्या तारखेवर पुनर्विचार करु शकतात.
'पुष्पा 2' मुळं इतर सिनेमांचं रिलीज शेड्यूल विस्कळीत