महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'तेरी बातों में उल्झा जिया'च्या कमाईत वाढ ; रिलीच्या दुसऱ्या दिवशी केली 'इतकी' कमाई - तेरी बातों में उल्झा जिया

'Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya' Box Collection Day 2: शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन अभिनीत 'तेरी बातों में उल्झा जिया'नं रिलीजच्या दुसऱ्या दिवशी चांगली कमाई केली आहे. हा चित्रपट आज रविवारी चांगली कमाई करू शकतो अशी अपेक्षा केली जात आहे.

'Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya' Box Collection Day 2
तेरी बातों में ऐसा उल्झा जिया बॉक्स कलेक्शन दिवस २

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 11, 2024, 11:53 AM IST

मुंबई - 'Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya' Box Collection Day 2: अभिनेता शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉनचा स्टारर 'तेरी बातों में उल्झा जिया'नं दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी संथ गतीनं सुरूवात केल्यानंतर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ नोंदवली गेली आहे. व्हॅलेंटाईन वीकमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं प्रेक्षकांचं मन जिंकल आहे. हा चित्रपट 9 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी 6.50 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 9.50 कोटीचा गल्ला जमवला आहे. आता या चित्रपटाचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 16.20 कोटीचं झालं आहे. शनिवारी चित्रपटाची एकूण हिंदी व्याप्ती 22.16 टक्के होती.

'तेरी बातों में उल्झा जिया' बॉक्स ऑफिस कमाई : हा चित्रपट रविवारी म्हणजेच 11 फेब्रुवारी म्हणजेच रविवारी चांगली बॉक्स ऑफिसवर कमाई करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. चित्रपट तज्ञ तरण आदर्श यांच्या मते, या चित्रपटानं सर्वाधिक ओपनिंग डे (परदेशात) 700 हजार डॉलर्सपेक्षा जास्त कमाई केली आहे. शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉन पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र दिसले आहेत. या चित्रपटामध्ये क्रितीनं सिफ्रा नावाच्या रोबोटची भूमिका साकारली आहे. तर हा रोबोट इंजिनिअरच्या भूमिकेत दिसला आहे. या चित्रपटात क्रिती सेनॉन, शाहिद कपूर व्यतिरिक्त धर्मेंद्र आणि डिंपल कपाडिया, राकेश बेदी, राजेश कुमार, आशीष वर्मा, अर्जुन पांचल यांसारखे मोठे स्टार्स आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगातील ही एक अनोखी प्रेमकहाणी चित्रपटाद्वारे दाखविण्यात आली आहे. 'तेरी बातों में उल्झा जिया' दिग्दर्शन अमित जोशी, आराधना साह यांनी केलंय.

वर्कफ्रंट : शाहिद कपूर आणि क्रिती सेनॉनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर शाहिद शेवटी 'ब्लडी डॅडी'मध्ये दिसला होता. याशिवाय तो 'बुल' आणि 'देवा' या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत. दुसरीकडे क्रिती पुढं 'हाऊसफुल्ल 5' आणि 'किल बिल' आणि 'द क्रू' या चित्रपटांमध्ये असणार आहेत.

हेही वाचा :

  1. कतरिना कैफ बनली चेन्नई सुपर किंग्जची ब्रँड ॲम्बेसिडर
  2. नाशिकमध्ये 'व्हॅलेंटाईन्स डे'निमित्त लव्ह मीटर करणार तुमच्या प्रेमाचे मोजमाप
  3. लेकीचं फेक अकाउंट बनवणाऱ्याला नम्रता शिरोडकरनं दिला सज्जड इशारा

ABOUT THE AUTHOR

...view details