मुंबई - Rhea chakraborty : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्ती ही प्रसिद्धीझोतात आली होती. आतादेखील सुशांतचे चाहते तिच्यावर अनेक गंभीर आरोप करताना दिसतात. सुशांतच्या मृत्यूनंतर तिला तुरुंगातही राहावे लागले होते. रिया गेल्या काही दिवसांपासून तिच्या शोमुळे चर्चेत आहे. तिनं स्वतःचे पॉडकास्ट सुरू केला आहे. यामध्ये ती इंडस्ट्रीतील स्टार्सशी चर्चा करते. आता सोशल मीडियावर रियाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात ती मुंबईच्या रस्त्यावर क्रूझर बाईकवर राइडचा आनंद लुटताना दिसत आहे.
रिया चक्रवर्तीच्या आयुष्यात आलं प्रेम ? : बाईकवर रियाबरोबर एक व्यक्ती देखील आहे. आता हा व्यक्ती कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी अनेकजण या व्हायरल व्हिडिओवर कमेंट्स करून याबद्दल चर्चा करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये रिया ही निखिल कामथबरोबर दिसत आहे. निखिल कामथ हा झेरोधाचा सह-संस्थापक आणि अब्जाधीश उद्योगपती आहे. निखिल व्हायरल व्हिडिओमध्ये क्रूझर बाईक चालवताना आणि काळा मास्क घातलेला दिसत आहे. निखिलची गणना भारतातील सर्वात तरुण अब्जाधीशांमध्ये केली जात आहे. आता अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यामातून त्याला रियापासून दूर राहण्याचा सल्ला देत आहेत.