मुंबई : 'गेम चेंजर' चित्रपट रुपेरी पडद्यावर 10 जानेवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. आता या चित्रपटाला पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये जात आहेत. राम चरण स्टारर 'गेम चेंजर' राजकीय अॅक्शन ड्रामा असून या चित्रपटाला आता प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. राम चरणचा दिग्दर्शक एस. शंकरबरोबरचा पहिल्याच चित्रपट आहे. एस. शंकर यांचा शेवटचा चित्रपट 'इंडियन 2' बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. एस. शंकर यांनी 'गेम चेंजर' चित्रपटाद्वारे तेलुगू चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे.
'गेम चेंजर'ची किती विकली गेली तिकिट :सॅकनिल्कच्या मते, राम चरण आणि कियारा अडवाणी स्टारर 'गेम चेंजर' बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकतो. हा चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवशी सुमारे 43.55 कोटी रुपयांची कमाई करेल. या चित्रपटाच्या तेलुगू 2डी आवृत्तीनं 726130 तिकिटे विकली, तर तमिळ 2डी आवृत्तीनं 48884 तिकिटे विकली. हिंदी 2डी 1,43,146 तिकिटे विकली गेली आहे. आता या चित्रपटाची एकूण कमाई 26-30 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. अहवालांनुसार, 'गेम चेंजर'नं शुक्रवारी सकाळी 10 वाजेपर्यंत भारतात सर्व भाषांमध्ये 12.75 कोटी रुपये कमावले आहेत.