मुंबई- Rakul Preet-Jacky Bhagnani Wedding: अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी हे जोडपे 21 फेब्रुवारीला लग्न करणार आहे, ज्यामध्ये त्यांच्या कुटुंबाव्यतिरिक्त काही जवळचे मित्रही सहभागी होणार आहेत. आता हे दोघेही त्यांच्या डेस्टिनेशन वेडिंगसाठी गोव्यात पोहोचले आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये दोन्ही स्टार्स त्यांच्या कुटुंबियांबरोबर गोवा विमानतळावर स्पॉट झाले. यावेळी रकुल केशरी रंगाच्या कॉर्ड-सेटमध्ये दिसली, तर जॅकीनं प्रिंटेड टी-शर्ट आणि काळी पॅन्ट परिधानं केली आहे. यावेळी त्याचा विमातळावरचा लूक हा फंकी होता.
गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावर होईल लग्न : रकुल आणि जॅकी गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावर होणार आहे. या जोडप्याचं लग्न इको-फ्रेंडली होईल. त्यांच्या लग्नात कोणत्याही प्रकारचे फटाके फोडले जाणार नाहीत. एवढेच नाही तर रकुल आणि जॅकीनं लग्नाच्या दिवशी झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय या दोघांच्या लग्नात 'नो फोन पॉलिसी' असणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार रकुल आणि जॅकीच्या लग्नात पाहुण्यांना फोन वापरण्याची परवानगी नाही. या जोडप्याला लग्नाची निमंत्रण पत्रिकाही यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्याच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर गोव्याच्या समुद्र किनारावर लग्न मंडप होता. दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडीओवर कमेंट्सचा पूर आला आहे.