मुंबई - Nora Fatehi deepfake video: अभिनेत्री आलिया भट्ट, कतरिना कैफ आणि रश्मिका मंदान्ना यांच्यानंतर आता बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही डीपफेक व्हिडिओची शिकार झाली आहे. अलीकडेच नोरानं इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचा डीपफेक दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, 'मला धक्का बसला आहे, ही मी नाही'. नुकताच, रश्मिका मंदान्नाचा डीपफेक तयार करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. कोणीतरी नोराचा डीपफेक व्हिडिओ तयार करून एका ब्रँड प्रमोशन करत आहे. नोराची ही पोस्ट सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे.
नोराचा व्हिडिओ :हा ब्रँड प्रमोशन व्हिडीओ अशा परफेक्ट पद्धतीनं बनवला गेला आहे की, त्यात खरोखर नोरा आहे की नाही हे देखील कोणालाही कळू शकत नाही. व्हिडिओमध्ये नोराचा आवाजही तिच्या आवाजासारखाच आहे. त्यामुळेच नोरानं या व्हिडिओचा स्क्रीनशॉट घेतला आणि तो तिच्या सोशल मीडियावर शेअर केला. बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री या डीपफेक व्हिडिओच्या शिकर होत असून या एकदा तर चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देखील एक डीपफेकचे शिकार झाले आहे. सोशल मीडियावर पीएम मोदींचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये पीएम मोदी हे गरबा खेळताना दिसले होते. यापूर्वी माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.