मुंबई- Janhvi Kapoor Climbs remple Stairs : अभिनेत्री जान्हवी कपूर हिला तिचा कथित बॉयफ्रेंड शिखर पहारिया या महिन्याच्या सुरुवातीला तिच्या वाढदिवसानिमित्त तिरुमला तिरुपती देवस्थानाला भेट देण्यासाठी मित्र ऑरीसह आला होता. ऑरीने या भेटीचा एक व्हिडिओ तपशीलवार माहिती आणि अनुभवासह शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये, जान्हवी, शिखर आणि ऑरीने अनवाणी चालताना दिसले आहेत.
जान्हवीने तिची आई श्रीदेवीची तिरुपती मंदिराला भेट देण्याची परंपरा सुरू ठेवली आहे. ती भगवान तिरुपतीचे पवित्र दर्शन घेण्यासाठी ती वारंवार तिरुपती मंदिरात जाताना दिसते. ऑरीने जारी केलेल्या व्हिडिओत जान्हवी, शिखर आणि त्याच्या स्वतःच्या अनेक अनुभवाच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. जान्हवीची ही साधारण तिरुपती मंदिराला पन्नासावी भेट असेल, तर शिखर पहारिया नऊ वेळा यापूर्वी मंदिरात दर्शनासाठी येऊन गेला आहे. ऑरीची मात्र ही पहिलीच भेट होती. चेन्नईतील जान्हवीच्या घरापासून त्यांनी प्रवास सुरू केला तिथ पासून या व्हिडिओमध्ये अनेक गोष्टी पाहायला मिळतात. यामध्ये जान्हीवी मंदिराच्या पायऱ्या अनवानी चढताना दिसते. तर ऑरी आणि शिखरही तिला फॉलो करतात. त्यांनी मध्ये थांबून घेतलेली विश्रांती, साजूक तुप असलेल्या दाक्षिणात्य भोजनावर सर्वांनी मारलेला ताव अशा अनेक गोष्टींचा व्हिडिओत समावेश आहे.