मुंबई - Sania Mirza :सानिया मिर्झा वैयक्तिक आयुष्यमुळे काही दिवसांपासून चर्चेत आहे. 2010 मध्ये तिनं क्रिकेटर शोएब मलिकबरोबर लग्न केलं होतं. या लग्नापासून सानियाला एक मुलगाही आहे. सानिया आणि शोएबचं नातं फार काळ टिकलं नाही. आता शोएब आणि सानियाचा घटस्फोट झाला आहे. सानिया आपल्या मुलाला एकटीचं सांभाळत आहे. शोएबनं घटस्फोटानंतर तिसरं लग्न पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदबरोबर केलंय. घटस्फोटानंतर सानिया आता प्रेमाच्या शोधात आहे. कपिल शर्माच्या शोमध्ये तिनं याबाबत खुलासा केला आहे. मेरी कोम, सानिया नेहवाल आणि सानिया मिर्झा या 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या पुढच्या भागात दिसणार आहेत.
सानिया मिर्झानं केलं विधान : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये या तिन्ही खेळाडूबरोबर कपिल मस्ती करताना दिसणार आहे. आगामी एपिसोडमध्ये कपिल सानियाबरोबर तिच्या आयुष्याविषयी बोलताना दिसेल. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये कपिल सानियाबरोबर बोलताना दिसत आहे. कपिलनं सानियाला आठवण करून दिली की, शाहरुख खाननं एकदा त्याच्या मुलाखतीदरम्यान म्हटलं होत की, जर सानियाच्या आयुष्यावर बायोपिक बनला तर तो खूप खास चित्रपट असेल. या चित्रपटात त्याला लव इंटरेस्ट भूमिका मिळेल का ? यानंतर सानिया म्हणते, "मला आधी लव इंटरेस्ट शोधावा लागेल." सानियाचे हे उत्तर ऐकून कपिल शर्मा आणि अर्चना पूरण सिंग हे जोरजोरात हसू लागतात.