महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

कियारा अडवाणी हॉस्पिटलाइज्डच्या घोषणेनं चाहते चिंतेत, नेमकं काय घडलंय जाणून घ्या... - KIARA ADVANI HOSPITALIZED NEWS

किया अडवाणी हॉस्पिटलाइज्ड झाल्यामुळं 'गेम चेंजर'च्या मुंबईतील कार्यक्रमाला हजर राहू शकली नाही, अशी घोषणा इव्हेन्टचा अँकर नितीननं केल्यामुळं चाहते चिंता करु लागले.

Kiara Advani
कियारा अडवाणी (ANI)

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 4, 2025, 2:12 PM IST

मुंबई - राम चरण आणि कियारा अडवाणीची भूमिका असलेला 'गेम चेंजर' हा आगामी चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे. या चित्रपटाचा ग्रँड प्री-इव्हेन्ट अमेरिकेत पार पडल्यानंतर जगभर या सिनेमाची हवा निर्माण झाली आहे. आता या चित्रपटाचा एक इव्हेन्ट मुंबईत सुरू असताना या कार्यक्रमाला कियारा अडवाणी हजर नव्हती याचं आश्चर्य उपस्थितांना वाटल्याशिवाय राहिलं नाही.

या कार्यक्रमाला कियारा उपस्थितीत का नाही याचा खुलासा होस्ट असलेल्या नितीन यानं केला. तो म्हणाला की, "या इव्हेन्टला कियारा हजर राहू शकलली नाही कारण ती हॉस्पिटलाइज्ड आहे." यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी पसरायला वेगळ लागला नाही. ती खरंच रुग्णालयात दाखल झाली आहे का?, तिला नेमकं काय झालंय? अशा शंका चाहत्यांच्या मनात तयार होत आहेत. त्यानंतर आम्ही या बातमीचा पाठपुरावा केला.

"कियारा अडवाणी हॉस्पिटलाइज्ड झालेली नाही. सतत काम करत राहिल्यामुळे तिला थकवा आला आहे आणि तिला विश्रांती घेण्याचा सल्ला मिळाल्यामुळं ती गेम चेंजरच्या इव्हेन्टला हजर राहू शकलेली नाही", असं तिच्या पीआर टीमनं कळवलं आहे. 'गेम चेंजर'च्या मुंबई इव्हेन्टमध्ये चित्रपटाचे दिग्गज कलाकार, निर्माते हजर राहिलेले असताना कियारा गैरहजर राहिल्यानंतर होस्ट नितीन यानं ती हॉस्पिटलाइज्ड असल्याचं सांगितल्यामुळे चाहत्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता.

'गेम चेंजर'च्या मुंबईतील कार्यक्रमात ग्लोबल स्टार राम चरण, अभिनेता एस जे सुर्या, निर्माता दिल राजू, अनिल थडानी आणि चित्रपटाची टीम हजर होती. गेम चेंजर चित्रपटाचा 2 जानेवारीला ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये एक मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. 'गेम चेंजर' या चित्रपटात राम चरणसह सुनील, नासिर, शुभलेखा सुधाकर, प्रकाश राज, प्रवीणा आणि मुरली शर्मा या चित्रपटात सहाय्यक भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचं बजेट सुमारे 400 कोटी रुपये आहे. या चित्रपटाचे निर्माते दिल राजू आणि शिरीष आहेत. 'गेम चेंजर'मध्ये एस. संगीत थमन यांचे आहे आणि चित्रपट श्री वेंकटेश्वर क्रिएशन्सच्या बॅनरखाली बनला आहे. 10 जानेवारीला हा चित्रपट रिलीज होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details