मुंबई - 52 वा आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार सोहळा 2024 चं भव्य आयोजन 25 नोव्हेंबर रोजी न्यूयॉर्क हिल्टन मिडटाऊन (यूएस) येथे करण्यात आलं होतं. अनेक टीव्ही सेलिब्रिटींनी अॅवार्ड फंक्शनला रात्री हजेरी लावली आणि सोहळा खूप ग्लॅमरस बनवला. एमी अवॉर्ड्स 2024 चे आयोजन भारतीय स्टँडअप कॉमेडियन आणि अभिनेता वीर दास यांनी केलं होतं. हा प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा एक भारतीय कलाकार होस्ट करत आहे ही देशासाठी अभिमानाची बाब आहे. वीर दासनं 2023 मध्ये पहिला एमी अवॉर्ड जिंकला होता आणि त्यानंतर त्याला आता हा शो होस्ट करण्याची संधी मिळाली.
एमी अवॉर्ड्स इंटरनॅशनल अकादमी ऑफ टेलिव्हिजन आर्ट्स अँड सायन्सेस (IATAS) द्वारे आयोजित केले जातात. यावेळी 21 देशांतील 56 कलाकारांना 14 श्रेणींमध्ये नामांकन मिळालं होतं. ड्रामा मालिका, कॉमेडी, डॉक्युमेंटरी, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, कला प्रोग्रामिंग, मुलांचे प्रोग्रामिंग आणि बरेच काही अशा अनेक श्रेणी यामध्ये होत्या. तर, भारतातून अनिल कपूर आणि आदित्य रॉय कपूर स्टारर 'द नाईट मॅनेजर' या मालिकेला ड्रामा सीरिजमध्ये नामांकन मिळालं होतं, पण विजय संपादन करता आला नाही.
एमी अवॉर्ड्स 2024 विजेत्यांची संपूर्ण यादी
- पियानोफोर्टे- आर्ट्स प्रोग्रामिंग
- अओकबाब-चुतिमोन चुएंगचारोएनसुकींग- बेस्ट परफॉर्मेंस अॅक्ट्रेस
- रेस्टोरेंट मिसवर्स्टैंड- सीजन 2- नॉन-स्क्रिप्टेडट एंटरटेनमेंट अॅवार्ड
- ब्राउन: द इम्पॉसिबल फॉर्मूला 1 स्टोरी- स्पोर्ट्स डॉक्यूमेंट्री अॅवार्ड
- शॉर्ट-फॉर्म सीरीज अॅवार्ड : पंट डे नो रिटर्न (प्वाइंट ऑफ नो रिटर्न)
- किड्स: लाइव-एक्शन अॅवार्ड: एन एफ़ ड्रेन्जीन (वन ऑफ द बॉयज)
- किड्स: फॅक्चुअल अँड एंटरटेनमेंट अॅवार्ड - ला विदा सेक्रेटा डे तू मेंटे (द सीक्रेट लाइफ ऑफ योर माइंड)
- किड्स: एनिमेशन अवार्ड: टॅबी मॅकटॅट
- टीवी मूवी/मिनी-सीरीज अॅवार्ड: लीब्स काइंड (डियर चाइल्ड)
- कॉमेडी अॅवार्ड : डिविजन पलेर्मो
- बेस्ट एक्टर : टिमोथी स्पाल (द सिक्स्थ कमांडमेंट)
- टेलीनोवेला अॅवार्ड : ला प्रोमेसा (द वॉव)
- डॉक्यूमेंट्री अॅवार्ड : ओटो बॅक्सटर: नॉट ए .... हॉरर स्टोरी
- ड्रामा सीरीज अॅवार्ड : लेस गौटेस डी डियू (ड्रॉप्स ऑफ गॉड)
एमी अॅवार्ड 2024 मध्ये भारताचं नामांकन
भारतीय प्रेक्षकांना 'द नाईट मॅनेजर' या सिरीजकडून खूप अपेक्षा होत्या. अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर, शोभिता धुलिपाला अभिनीत या मालिकेला फ्रेंच ड्रामा 'लेट्स गॉट्स डे दिउ' ( ड्रॉप ऑफ गॉड ) च्या विरुद्ध नामांकन मिळालं होतं. मात्र 'द नाईट मॅनेजर'नं निराशा केली आहे.