मुंबई - अभिषेक बच्चनची भूमिका असलेला 'आय वॉन्ट टू टॉक' हा चित्रपट 22 नोव्हेंबर रोजी रिलीज झाला आणि चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अपेक्षेपेक्षा जास्त कमाई केली आहे. याचं दिग्दर्शन शूजित सरकार यांनी केलं आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चननं एका मुलीच्या आजारी अविवाहित बापाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन अतिशय दमदार अभिनय करताना दिसत आहे. पत्रकार सीमा सिन्हा यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक शूजित सरकार यांच्याशी खास बातचीत केली आणि चित्रपटाशी संबंधित मनोरंजक गोष्टी जाणून घेतल्या आहेत.
अभिषेक बच्चन आणि शूजित सरकार ((IMAGE/ETV Bharat)) 'आय वॉन्ट टू टॉक'ची कल्ना कशी सूचली?
सुजित सरकार 'पिकू' आणि 'ऑक्टोबर' सारख्या उत्कृष्ट चित्रपटांसाठी ओळखले जातात. आताही त्यानं अभिषेक बच्चनसह 'आय वॉन्ट टू टॉक' ही अशीच साधी कथा असलेला चित्रपट आणला आहे. यामध्ये बाप आणि मुलीचं नात कधी बिघडताना तर कधी भावनिक होताना दिसतं. या चित्रपटाबद्दल शूजित म्हणतो की, हा चित्रपट नात्यांमधील सत्यता दाखवतो, ज्याचा आपण दररोज सामना करत असतो. ही कथा शूजित सरकारचा सिंगल फादर मित्र अर्जुन सेनशी संबंधित आहे.
अभिषेक बच्चन आणि शूजित सरकार ((IMAGE/ETV Bharat)) दिग्दर्शक शूजित सरकार म्हणाला, "अभिषेक बच्चन यामध्ये माझा मित्र अर्जुन सेनची भूमिका साकारत आहे, ज्याला मी पाच वर्षांपासून ओळखतो, तो ह्यूस्टनमध्ये राहतो आणि एक एनआरआय आहे. तो व्यवसायानं एक आयआयटीयन आहे आणि गेल्या 30 ते 35 वर्षांपासून तो तिथं राहतो. 2020 मध्ये त्यानं मला त्याच्या कुटुंबाबद्दल (पत्नी आणि मुलगी) प्रेरित केलं. त्याची कथा जगण्याची आहे, ही कथा कधी लवचिक तर कधी कठोर दिसते, ही कथा मुलीच्या वडिलांची आहे. तिच्या धाडसावर मी थोडं हसलो, उपचारादरम्यान तिच्याबरोबर जे घडलं ते पाहून मलाही हसू आलं, पण आपण पुरुष महिलांपेक्षा कमी कसे व्यक्त होतो हे पाहून मी थक्क झालो, या कथेचा मला धक्का बसला आणि मी या कथानकावर चित्रपट बनवण्याचा विचार केला."
अभिषेक बच्चन आणि शूजित सरकार ((IMAGE/ETV Bharat)) चित्रपट कोणत्या आजारावर आधारित आहे का?
" 'आय वॉन्ट टू टॉक' हा चित्रपट कोणत्याही आजारावर आधारित नसून संकटांनंतरही मनमोकळेपणानं जीवन जगण्याची ही कथा आहे. हे पात्र अभिषेकने ज्या पद्धतीने जगले ते बघा", अस म्हणत सुजित सरकारनं चर्चेत स्पष्ट केलं की, या पात्रात विनोदाची अद्भुत भावना आहे, जी अभिषेकने खूप छान दाखवली आहे. अभिषेकची व्यक्तिरेखा मानवी भावनेबद्दल आहे, चित्रपटाबद्दल बोलताना, शुजीतनं शूटिंगदरम्यान अभिषेकबरोबर झालेल्या चर्चेचाही खुलासा केला. यावेळी अर्जुन सेन आपल्या संवादात म्हणतो, 'अब मेरी शादी कँसर से हो गई है, इसलिए अब मुझे इसे अपने साथ रखना होगा'.
अभिषेक बच्चन आणि शूजित सरकार ((IMAGE/ETV Bharat)) 'आय वॉन्ट टू टॉक' चित्रपटात इरफान खान असता का?
आपल्याला आठवत असेल की, सुजित सरकार यांनी इरफान खानबरोबर 'पिकू' चित्रपटात काम केलं होतं. शूजित सिरकारनं इरफान खानबरोबरच्या त्याच्या अप्रतिम बाँडिंगबद्दलही खुलासा केला. आज तो त्याच्याबरोबर नाही याबद्दल खूप दुःख होत असल्याचं सांगितलं. दिग्दर्शक शूजित सिरकार म्हणाला, "जेव्हा मी कथा लिहितो तेव्हा इरफान माझ्या मनात येतो, तो नेहमी माझ्या विचारात असतो. मी अभिषेकला सांगितलं की इरफान असता तर त्यानं ही भूमिका केली असती, यावर अभिषेकने मला सांगितलं की, प्लिज, धमकी देऊ नकोस. तर मी त्याला मी म्हणटलं की धमकी नाही तर तुला प्रेरणा देत आहे."
जॉनी लिव्हर, अभिषेक बच्चन आणि शूजित सरकार ((IMAGE/ETV Bharat)) अभिषेक बच्चनला भूमिका कशी मिळाली?
दिग्दर्शक म्हणाला, "आम्ही 2021 मध्ये चित्रपट लिहायला सुरुवात केली आणि आमच्या मनात नेहमीच अभिषेक होता आणि जेव्हा मी त्याला भूमिका ऑफर केली तेव्हा अभिषेकला आनंदाने धक्का बसला. तो त्याबद्दल पूर्णपणे कृतज्ञ होता, त्याच्याकडे चित्रपट घेण्यामागे अनेक कारणे होती. जसं की तो एका मुलीचा पिता देखील आहे, तो एक अनुभवी कौटुंबिक माणूस आहे आणि तो 40-45 वर्षांची व्यक्तिरेखा साकारू शकतो, आणि तिसरं म्हणजे त्यानं अमेरिकेतही शिक्षण घेतलं आहे, जिथं या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे, त्यामुळे तिथले मॅनर्स, लोक आणि भाषा ही त्याला अवगत आहे. "
अभिषेक बच्चनला काहीही समजावून सांगायची गरज पडली नाही
ही भूमिका साकारण्यासाठी अभिषेक बच्चनला काय खबरदारी घेण्यास सांगितले होतं, असे विचारले असता दिग्दर्शक म्हणाला, "मी अभिषेकला काहीच सांगितलं नाही, आम्ही फक्त बोललो, भूमिकेबद्दल सांगितलं आणि बाकी सर्व काही त्याच्यावर सोडलं. कथाकथन झालंं नाही की वर्कशॉप झालं नाही. तो त्याच्या वडिलांप्रमाणे त्याचे संवाद आणि ओळी लक्षात ठेवण्यात माहीर आहे. पण शूटिंगदरम्यान मला जाणवलं की, त्याच्या कामात त्याच्या आईच्या कामाची झलक दिसून येते. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे बाप आणि मुलगी यांच्या नात्याबद्दल त्याला अधिक काही सांगावं लागलं नाही. हे सर्व त्याच्या अभिनयातून दिसत होतं."
अभिषेक-ऐश्वर्याच्या विभक्त अफवांचा चित्रपटावर काही परिणाम?
दिग्दर्शक म्हणाला, "नाही, तसं काही नाही, अफवा नेहमीच अफवा असतात, पण सेटवर मला आणि अभिषेकला या गोष्टींनी काहीच फरक पडला नाही, अभिषेक हा त्याच्या कुटुंबाशी, मुलगी आणि पत्नीशी जडलेला माणूस आहे, लोक काही तरी बोलत असतातच."