मुंबई - Devara Box Office Collection Day 1:साउथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआर, सैफ अली खान आणि जान्हवी कपूर स्टारर 'देवरा पार्ट 1' 27 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाची अनेकजण आतुरतेनं वाट पाहत होते. शेवटी हा चित्रपट ज्युनियर एनटीआरच्या चाहत्यांनी पाहाला. 'देवरा पार्ट 1' चित्रपट आता अनेकांना खूप आवडत आहे. या चित्रपटाच्या ओपनिंग कलेक्शनकडून निर्मात्यांना मोठ्या अपेक्षा होत्या, त्यामुळे 'देवरा पार्ट 1' त्यांच्या अपेक्षांवर खरा उतरला आहे की नाही हे जाणून घेऊया.
'देवरा पार्ट 1'चं पहिल्या दिवसाचे कलेक्शन : 'देवरा पार्ट 1'च्या ओपनिंग कलेक्शनबद्दल बोलायचं झालं या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी चांगली कामगिरी केली आहे. ज्युनियर एनटीआर स्टारर 'देवरा पार्ट 1'च्या तेलुगू आवृत्तीनं बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. 'देवरा पार्ट 1'नं पहिल्या दिवशी तेलुगूत - 68.6 कोटी, हिंदी -7 कोटी, कन्नड - 30 लाख, तमिळ- 80 लाख , मल्याळम - 30 लाख, अशी रुपेरी पडद्यावर कमाई केली आहे.'देवरा पार्ट 1' तेलुगूचा शुक्रवारी एकूण 79.56% व्याप होता. एकूणच, या चित्रपटानं भारतातील सर्व भाषांमध्ये 77 कोटी जमा केले, तर जगभरामध्ये 172 कोटींची कमाई केली आहे.
'स्त्री 2' आणि 'कल्की 2898 'एडी'ला मागे टाकले : ज्युनियर एनटीआरच्या 'देवरा पार्ट 1'नं सुरुवातीच्या कलेक्शनमध्ये प्रभासच्या 'कल्की 2898 एडी' आणि 'सालार'ला मागं टाकलं आहे. 'कल्की 2898 'एडी'नं पहिल्या दिवशी 66 कोटी रुपये आणि 'सालार'नं तेलुगू भाषेत 66.75 कोटी रुपयांची कमाई केली होती. यासह 'देवरा पार्ट 1'नं अमर कौशिकच्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'स्त्री 2'च्या ओपनिंग कलेक्शनलाही मागे टाकले आहे. आताृ 'देवरा पार्ट 1' हा पुढं कशी कामगिरी करतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर, जान्हवी कपूर, सैफ अली खान, प्रकाश राज, श्रीकांत मेका, टॉम शाइन चाको आणि नारायण यांच्या विशेष भूमिका आहेत. एनटीआरनं चित्रपटात देवरा आणि वरदा अशी दुहेरी भूमिका साकारली आहे. सैफ अली खाननं या चित्रपटात खलनायकाची भूमिका केली असून, त्याच्या पात्राचं नाव भैरा आहे. 'देवरा पार्ट 1' चित्रपटाचं दिग्दर्शन कोराताला शिवा यांनी केलंय. हा चित्रपट तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषेत रुपेरी पडद्यावर रिलीज झाला आहे.
हेही वाचा :
- ज्यू. एनटीआरच्या 'देवरा' शोला उशीर झाल्यानं थिएटरमध्ये तोडफोड, पाहा व्हिडिओ - Devara screening vandalize
- ज्यू. एनटीआर सोलो हिरो म्हणून ग्रँड रिटर्न : 'देवरा: भाग 1' रचणार कमाईचा नवा विक्रम - Devara Box Office Collection
- 'देवरा पार्ट 1'चं रिलीज सेलिब्रेशन झालं भव्य, प्रेक्षकांनी दिली चित्रपटाला पसंती - jr ntr movie