मुंबई - Deepika Padukone: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणनं तिचा पहिला हॉट आणि बोल्ड मॅटर्निटी फोटोशूट केला. यानंतर तिनं सोशल मीडियावर तिचे सुंदर फोटो शेअर करून चाहत्यांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. दीपिका पदुकोणच्या मॅटर्निटी फोटोशूटला लाईक्सचा पूर आला आहे. दीपिकाच्या मॅटर्निटी फोटोशूटला आतापर्यंत 5 मिलियनहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तिच्या मॅटर्निटी फोटोशूटमध्ये पती रणवीर सिंगचाही समावेश आहे. आता या कपलचा फोटोशूट सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. दरम्यान दीपिका याच महिन्यात आई होणार आहे.
मॅटर्निटी फोटोशूटसाठी मिळाले जास्त लाईक्स : मॅटर्निटी फोटो शेअर करून 'दीपवीर'नं त्याच्या चाहत्यांना एक जबरदस्त भेट दिली आहे. उल्लेखनिय बाब म्हणजे, अभिनेत्री आलिया भट्टच्या पहिल्या मॅटर्निटी फोटोशूटला देखील खूप लाइक्स मिळाले आहेत. आलियाच्या प्रेग्नेंसी पोस्टला 5 मिलियनहून पेक्षा जास्त लाईक्स मिळाले होते. दीपिका पदुकोणच्या मॅटर्निटी फोटोशूटला 24 तासही उलटले नाहीत आणि 5 मिलियनहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. नुकतीच रिचा चढ्ढानं तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. करीना कपूर खान, अनुष्का शर्मा, नेहा धूपिया, सोनम कपूर आणि काजल अग्रवाल यांनीही त्यांच्या मॅटर्निटी फोटोशूटचे फोटो चाहत्यांमध्ये शेअर केले होते. हे फोटो देखील चाहत्यांना खूप आवडले होते.