महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

टायगर श्रॉफने उघडले सेलेब्रिटी फिटनेस सेंटर, एक्स दिशा पटानीनं लावली नव्या बॉयफ्रेंडबरोबर हजेरी - Tiger Shroff fitness center - TIGER SHROFF FITNESS CENTER

Tiger Shroff fitness center : टायगर श्रॉफने मुंबईत त्याचे फिटनेस सेंटर उघडले आहे. विशेष म्हणजे याच्या उद्घाटनाला त्याची एक्स गर्लफ्रेंड दिशा पटानी तिच्या बॉयफ्रेंडबरोबर आली होती. त्यामुळे अनेकांनी आपल्या भुवया उंचावल्या.

Tiger Shroff
टायगर श्रॉफ

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 6, 2024, 12:14 PM IST

मुंबई- Tiger Shroff fitness center : बॉलिवूडचा लोकप्रिय अ‍ॅक्शनहिरो टायगर श्रॉफ तरुणाईचा आवडता अभिनेता आहे. सध्या तो त्याच्या आगामी 'बडे मियाँ छोटे मियाँ' या अ‍ॅक्शन चित्रपटामुळे चर्चेत आहे. अक्षय कुमारबरोबर दमदार अ‍ॅक्शन करण्यासाठी सज्ज असलेला हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी टायगर श्रॉफने मुंबईत त्याचे फिटनेस सेंटरचे उद्घाटन केलं. या कार्यक्रमाला फिल्म इंडस्ट्रीतील अनेकजण उपस्थित होते. यामध्ये टायगर श्रॉफची एक्स गर्लफ्रेंड दिशा पटानी तिच्या नव्या कथित बॉयफ्रेंडसह पोहोचली होती.

टायगरने सांताक्रूझमध्ये त्याचे फिटनेस सेंटर उघडले आहे. टायगर श्रॉफचे स्टार वडील जॅकी श्रॉफ आणि त्याची बहीण कृष्णा श्रॉफही या घरगुती कार्यक्रमाला हजर होते. त्याचवेळी सर्व स्टार्स स्टायलिश लूकमध्ये दाखल होताना दिसले. येथे दिशा पटानीही तिचा बॉयफ्रेंड अलेक्झांडर एलेक्सबरोबर पोहोचली होती. यावेळी हिंदी चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका करणारे अभिनेता डॅनी यांचा मुलगा रिंझिंग डेंगजोम्पाही या कार्यक्रमात दिसला.

'बडे मियाँ छोटे मियाँ' कधी रिलीज होणार?

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा बहुर्रतीक्षित चित्रपट १० एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी बनवलेल्या या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्यांनी यापूर्वी सलमान खान बरोबर 'भारत' आणि 'टायगर जिंदा है' सारखे चित्रपट केले आहेत.

'बडे मियाँ छोटे मियाँ' हा अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपट आहे, ज्यामध्ये 'द गॉट लाइफ'मुळे सध्या चर्चेत असलेला अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. मानुषी छिल्लर आणि आलिया एफ या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून दिसणार आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अजय देवगणच्या 'मैदान' या चित्रपटाशी टक्कर देईल.

हेही वाचा -

'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या एका दिवसाच्या स्टंटचा खर्च होता 3-4 कोटी, दिग्दर्शकानं केला खुलासा - Bade Miyan Chote Miyan

'पुष्पा 2' मधील रश्मिका मंदान्नाचा 'श्रीवल्ली लूक' लॉन्च, निर्मात्यांनी चाहत्यांनी दिलं बर्थडे गिफ्ट - Srivalli first look

दिशा पटानीनं शेअर केले इटलीतील 'कल्की 2898 AD' च्या शूटिंगचे प्रभास बरोबरचे फोटो - Disha Patani Photo

ABOUT THE AUTHOR

...view details