मुंबई - Alanna Panday Welcomed a Baby Girl :बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडेनं मुलीला जन्म दिला आहे. सोमवारी 8 जुलै रोजी अलानानं पती आयवर मॅकक्रेबरोबर एक पोस्ट शेअर केली आहे. या जोडप्यानं शेअर केलेला हा व्हिडिओ अनेकांना आवडत असून काहीजण यावर प्रतिक्रिया देऊन यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. या पोस्टवर अलानानं लिहिलं, "आमच्याकडे एक छोटी परी आहे." दुसरीकडे, अनन्या पांडेनं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि तिच्या भाचीच्या स्वागताचा आनंद व्यक्त केला आहे.
अनन्या पांडे बनली मावशी, बहीण अलना पांडेनं दिला मुलीला जन्म... - ananya panday became an mausi - ANANYA PANDAY BECAME AN MAUSI
Alanna Panday Welcomed a Baby Girl: अनन्या पांडे मावशी बनली असून तिनं एक इंस्टाग्राम स्टोरीवर व्हिडिओ शेअर केला आहे. यात तिनं मावशी झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे.
Published : Jul 8, 2024, 1:04 PM IST
अनन्या पांडेनं शेअर केला व्हिडिओ :या पोस्टवर तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "माझी सुंदर भाची आली आहे." अलाना आणि आयवर यांनी बाळ होण्याआधी देखील, काही फोटो शेअर करून बाळ होणार याबद्दलची घोषणा केली होती. तसंच अलानाचे काही बेबी शॉवरचे देखील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तिच्या बेबी शॉवरमधील थीम ही ब्लू होती. या कार्यक्रमामधील सुंदर फोटो अनेकांना पसंत पडले होते. अलाना पांडेच्या बेबी शॉवरमध्ये शनाया कपूर आणि अनन्या पांडेनं हजेरी लावली होती. अनन्या पांडेची चुलत बहीण अलना पांडेनं मार्च 2023 मध्ये परदेशी बॉयफ्रेड आयवर मॅकक्रेबरोबर लग्न केलं होतं. या जोडप्याचं लग्न खूप चर्चेत होतं.
अनन्या पांडेचं वर्कफ्रंट : या जोडप्याच्या लग्नात अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. दरम्यान अनन्या पांडेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटी नेटफ्लिक्स रिलीज 'खो गये हम कहाँ' मध्ये दिसली होती. यामध्ये तिनं सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरवनं स्क्रीन शेअर केली होती. आता पुढं ती 'कॉल मी बे' या वेब सीरीजमध्ये दिसणार आहे. यात तिच्याबरोबर वीर दास, मुस्कान जाफेरी, वरुण सूद, गुरफतेह पिरजादा, लिसा मिश्रा, मिनी माथूर, निहारिका लिरा दत्त आणि विहान सामंत हे कलाकार दिसणार आहेत. तिची सध्या ही वेब सीरीज खूप चर्चेत आहे.