नवी दिल्ली Sanjay Raut On Kangana Beaten Case :लोकसभा निवडणूक निकाल 2024 मध्ये महाविकास आघाडीला घवघवित यश मिळालं. त्यामुळे महाविकास आघाडीत मोठा उत्साह आहे. मात्र सरकार स्थापन करण्यासाठी त्यांच्याकडं पुरेसं संख्याबळ नाही. यावर बोलताना आता संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या मदतीनं एनडीए देशात सरकार स्थापन करणार आहे. मात्र नितीश कुमार आणि चंद्राबाबू हे सगळ्यांचे आहेत. ते आज तुमच्याकडं आहेत, मात्र उद्या आमच्याकडं असतील, असा मोठा सूचक दावा संजय राऊत यांनी दिल्लीत केला.
नितीश कुमार चंद्राबाबू नायडू सगळ्यांचेच :एनडीए नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या मदतीनं केंद्रात सरकार स्थापन करणार आहे. मात्र नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे सगळ्यांचेच आहेत. आज नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू तुमच्याकडं आहेत. मात्र उद्या ते आमच्याकडं असतील, असा सूचक दावा उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी दिल्लीत केला.