बंगळुरू FIR Against BS Yediyurappa : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्यावर एका 17 वर्षाच्या अल्पवयीन तरुणीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप पीडितेच्या आईनं केला आहे. पीडितेच्या आईनं सदाशिवनगर पोलीस ठाण्यात माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरुन माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याच्या ( POCSO ) विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पोक्सोनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील सत्यता पडताळून पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप :कर्नाटकमधील भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्यावर एका 17 वर्षाच्या मुलीचा लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडितेच्या आईनं या प्रकरणी बंगळुरूमधील सदाशिवनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पीडितेच्या आईनं दिलेल्या तक्रारीवरुन माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याच्या विविध कलमानुसार तसेच भांदवी कलम 354 ए नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.