महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 16, 2022, 6:46 PM IST

ETV Bharat / videos

VIDEO : उद्योगपती गौतम अदानी आणि रोहित पवारांचा एकाच गाडीतून प्रवास

बारामती - सायन्स अँड इनोवेशन ॲक्टिव्हिटी सेंटरचे उद्घाटन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर व प्रसिद्ध उद्योजक गौतम अदानी ( Famous entrepreneur Gautam Adani ) उपस्थित होते. एकीकडे केंद्रातील भाजपा सरकार उद्योजक अदानी यांना उद्योग क्षेत्रात झुकते माप देत असल्याचा आरोप राष्ट्रवादीतील काही नेते करत असतानाच बारामतीत ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांच्यासह उद्योगपती गौतम अदानी एकाच व्यासपीठावर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या अदानी यांचे स्वागत करण्याची जबाबदारी आमदार रोहित पवार ( MLA Rohit Pawar ) यांनी पार पाडली. गौतम अदानी आणि रोहित पवार एका गाडीतून प्रवास केला. विशेष म्हणजे रोहित पवारांनी स्वतः गाडी चालवत गौतम अदानी यांना मुख्य कार्यक्रम स्थळापर्यंत पोहोचवले. यामुळे राजकीय वर्तुळात या प्रसंगाची चर्चा रंगली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details