Python Hunted Dog : महाकाय अजगराने केली श्वानाची शिकार; पाहा धक्कादायक व्हिडीओ
कोटा - कोटा येथील थर्मल परिसरात 13 फूट उंच रॉक अजगर (पायथन) आढळल्याची घटना समोर आली आहे. या अजगराने तेथून जाणाऱ्या श्वानाची शिकार केली आहे. याबाबतचा व्हिडीओ समोर आला आहे. अजगर सापाची शिकार करत असताना तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांची काही काळ ह्रदय थांबलं होते. त्यानतंर साप पकडणाऱ्या गोविंद शर्मा यांना बोलवण्यात आलं. मात्र, अजगर सापाची शिकार करण्याच्या अवस्थेत असल्याने त्यांना श्वानाला सोडवलं नाही. अजगराने श्वानाला पूर्ण गिळंकृतक केले. नंतर थर्मल येथील जंगल परिसरात तो निघून गेला. दरम्यान, अजगराने श्वानाची शिकार केलेला हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत ( Python Hunted Dog ) आहे.