महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 17, 2022, 1:01 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

ETV Bharat / videos

खोके घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक

मुंबई - ओला दुष्काळ जाहीर करा, अतिवृष्टीग्रस्तांना मदत करा, ईडी सरकार हाय हाय, खोके घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो, अशा गगनभेदी घोषणा देत महाविकास आघाडीतील पक्षांच्या आमदारांनी विधानभवनाचा परिसर दणाणून सोडल. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अधिवेशन सुरू होण्याआधी विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळाले. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षाने जोरदार घोषणाबाजी केली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर सरकार विरोधात जोरदार घोषणा देत आक्रमकपणे सरकार विरोधात लढणार असल्याचे स्पष्ट केले. पहिल्याच दिवशी विरोधकांनी या घोषणाबाजीतून सत्ताधारी पक्षाला इशारा देत हे पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार असल्याचे संकेत दिले आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:26 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details