महाराष्ट्र

maharashtra

Heavy Rain In Buldana

By

Published : Apr 30, 2023, 7:42 PM IST

ETV Bharat / videos

Heavy Rain In Buldana : बुलडाणा जिल्ह्यात गारपिटीसह मुसळधार पाऊस, जामठीतील पूरात 5 गायी गेल्या वाहून

बुलडाणा :बुलडाणा जिल्ह्यात दुपारी आलेल्या अचानक पावसाने सगळ्यांची तारांबळ उडाली. जिल्ह्यात सतत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू आहे. यामुळे जनजीवन विस्कळित झाले असून शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे, फळबागांचे नुकसान होत आहे. तर नदी, नाले वाहत असून शेत तळ्यात पणी साचले आहे. चिखली,मेहकर, सिंदखेड राजासह इतर तालुक्यात आज दुपारी अवकाळी पाऊस गारपीट झाली. यामुळे मोठ नुकसान झाल्याचा अंदाज आहे. बुलडाणा तालुक्यात, अजिंठा डोंगरदऱ्या खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसाने जामठी गावाजवळून वाहणाऱ्या ओढ्याला अचानक आलेल्या पुरामुळे शेतातून गावाकडे जाणारी काही गुरे वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. त्याचे व्हिडिओ देखील समाज माध्यमात व्हायरल होत आहे. मागील सलग चार दिवसापासून अवकाळी पावसाने संपूर्ण जिल्ह्याला वेढा घातला असून भर एप्रिल महिन्यात देखील सूर्य देवाचे दर्शन दुर्लभ होत चालले आहे. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने परिसरातील भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात अवकाळी पावसाने अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. 

ABOUT THE AUTHOR

...view details