Heavy Rain in Raver: रावेर तालुक्यात मुसळधार पाऊस; रावेरचे माजी उपनगराध्यक्ष सुधीर पाटील पुरात वाहून गेले
जळगाव :सातपुडाच्या पर्वतरांगात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे रावेर येथील नागझरी नदीसह इतर नद्या-नाल्यांना पूर आला आहे. (Heavy Rain in Raver) रावेरचे माजी उपनगराध्यक्ष सुधीर पाटील (Sudhir Patil swept away in flood) हे देखील दुचाकीसह वाहून गेले. तर खिरोदा येथे पुरात कार वाहून गेल्याने नागरिकांनी कारच्या काचा फोडून कारमधील दोन ते तीन जणांना वाचवले. (Former Vice President of Raver) नागझरी नदीपात्रात पोलिसांकडून शोध कार्य सुरू आहे. वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला आहे. मुसळधार पावसामुळे रावेर शहरातील नागझरी नदीसह इतर नदी नाल्यांना पूर आला आहे. दरम्यान नागझरी नदीत अचानक आलेल्या पुरामुळे दोन ते तीन जण वाहून गेले असून यात रावेरचे माजी उपनगराध्यक्ष देखील आपल्या दुचाकीसह वाहून गेल्याची माहिती आहे. तसेच खिरोदा गावात पुरात कार वाहून गेल्याने नागरिकांनी तात्काळ कारच्या काचा फोडून तीन ते चार प्रवाशांना वाचवले असून नागझिरी नदीपात्रात पोलिसांकडून शोध कार्य सुरू आहे.