महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 17, 2020, 7:46 PM IST

ETV Bharat / state

वंचित बहुजन आघाडीचे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी आंदोलन

यवतमाळ मध्ये वंचित बहुजन आघाडीने केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी आंदोलन केले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी ऊपस्थित होते.

Vanchit Bahujan Aghadi agitates in Yavatmal for the demands of farmers
वंचित बहुजन आघाडीचे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी आंदोलन

यवतमाळ -ओला दुष्काळ, बोगस बियाणे, बोंड अळी अशा विविध संकटामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी. यासाठी शासनाकडे वारंवार मागन्या, निवेदने, मोर्चे काढण्यात आले. मात्र, याची कुठलीच दखल अद्यापही शासनाकडून घेण्यात आली नाही. त्यामुळे आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने घाटंजी येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्या मंजूर न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. तसेच दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा असून कृषी कायदे रद्द झाल्याशिवाय वंचित बहुजन आघाडी स्वस्थ बसणार नसल्याचेही यावेळी आंदोलकानी स्पष्ट केले.

वंचित बहुजन आघाडीचे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शेतकरी आंदोलन

कृषी कायदे रद्द करा -

केंद्र सरकारने तिन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या विरोधातली केली आहे ते रद्द करावे, अवकाळी पावसाने जे शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना त्वरीत मदत करण्यात यावी, वन्यप्राण्या पासून जे शेतमालाचे नूकसान झाले आहे त्याची भरपाई त्वरीत देण्यात यावी, शेतकऱ्यांना दहा हजार रूपये प्रती हेक्टर नुकसान भरपाई देण्यात यावी, कृषी माल हमी भावा पेक्षा कमी भावाने खरेदी करणाऱ्या वीरोधात गुन्हे नोदंवण्यात यावेत ईत्यादी मागण्या घेऊन घाटंजी तहसील समोर वंचीत आघाडी व गोडंवाना सग्रामतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी ऊपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details