महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकने म्हणजे मोठी घोडचूक  - उपविभागीय अधिकारी डॉ. जावळे

स्पर्धा परीक्षेत मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांचेच वर्चस्व राहते. मी सुद्धा राज्य सेवा स्पर्धा परीक्षा मराठीतून शिक्षण घेतल्यामुळेच यशस्वी होऊ शकलो, असे प्रतिपादन येथील उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी केले.

By

Published : Jul 15, 2019, 12:37 PM IST

यवतमाळ

यवतमाळ- महाराष्ट्रातील पालक आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकून मोठी घोडचूक करत आहेत. स्पर्धा परीक्षेत मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांचेच वर्चस्व राहते. मी सुद्धा राज्य सेवा स्पर्धा परीक्षा मराठीतून शिक्षण घेतल्यामुळेच यशस्वी होऊ शकलो, असे मत येथील उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी व्यक्त केल आहे. ते येथील नगर वाचनालयात विविध संस्थेद्वारा आयोजित करण्यात आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात बोलत होते.

मराठीतून शिक्षणामुळे अधिकारी होऊ शकलो - उपविभागीय अधिकारी डॉ. जावळे

शहरातील मित्रमंडळ, नगर वाचनालय, जैताई मंदिर, विदर्भ साहित्य संघ, वनिता समाज व प्रेस वेलफेअर असोसिएशनतर्फे 10 वी, 12 वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व प्रेस वेल्फेअरतर्फे 'कोळसा उद्योगाचा प्रदूषणावर होणारा परिणाम व उपाय' या विषयावर आयोजित निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर विदर्भ साहित्य संघाचे स्थानिक शाखेचे अध्यक्ष प्रा. दिलीप अलोणे, प्रेस वेलफेअरचे अध्यक्ष गजानन कासावार हे उपस्थित होते. या प्रसंगी इयत्ता दहावीत सर्वाधिक गुण मिळवणारे ऋत्विक चौधरी, मानसी डहाळकर यांचा मराठी विषयात सर्वाधिक गुण मिळवणारे श्वेता पांडे, तन्वी पेंदोर, सर्वेश बिवलकर यांचा तर इयत्ता बारावीत सर्वाधिक गुण मिळविणारे प्रेरणा तातेड, भूषण ढुमने यांचा व मराठी विषयात सर्वाधिक गुण मिळवणारे वैष्णवी थाटे, सृष्टी डाखरे, अक्षता वाघमारे यांना पुरस्कार देऊन पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

निबंध स्पर्धेत प्रा. डॉ. अभिजित आवारी, शालू हेमंत रासेकर, ज्योती राजू रुयारकर, हेमंत रसिका देवराव मालेकर, निकेश सुभाष डाहूले, पल्लवी प्रकाश भटारकर यांना अनुक्रमे सात क्रमांकाची बक्षिसे पाहुण्यांचे हस्ते देण्यात आली. यापैकी प्रा. अभिजित आवारी व शालू रासेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या रासेकर यांनी पुरस्काराची रक्कम शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या नाम फाऊंडेशनला पाठवण्याची घोषणा केली.

ABOUT THE AUTHOR

...view details