यवतमाळ -स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोट निवडणुकांच्या मतदानाला सुरवात झाली आहे. यवतमाळच्या बचत भवन या केंद्रावर मतदान होत आहे. जिल्ह्यात वणी, राळेगाव, केळापूर, यवतमाळ, दारव्हा ,पुसद आणि उमरखेड येथील तहसील कार्यालयात मतदान सुरू आहे.
यवतमाळ जिल्ह्यामध्ये 489 मतदार असून यामध्ये 244 महिला मतदार आहे. महाविकास आघाडीकडून दुष्यंत चतुर्वेदी हे उमेदवार आहेत, तर भाजपकडून सुमित बाजोरिया उमेदवार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थामधील एकूण संख्याबळामध्ये भाजप 180, शिवसेना 101, राष्ट्रवादी 55, काँग्रेस 80, अपक्ष 55, बसप 2, एमआयएम 8, सप 2, असे पक्षीय बलाबल आहे. त्यात पंचायत समिती सभापती जिल्ह्यात भाजप 5, शिवसेना 6, राष्ट्रवादी 2, काँग्रेस 3, असे एकूण 489 मतदार आहेत.