महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक; मनसेने बँक व्यवस्थापकाला चोपले, गरीबांची लुबाडणूक केल्याचा आरोप

अतिरिक्त व्याजाचे आमिष दाखविल्यामुळे सर्वसामान्य जनतेनी आपल्या मेहनतीच्या पैशाची गुंतवणूक या बँकेत केली. मात्र गुंतवणूक करणाऱ्यांना पैसे परत देण्यास बँक टाळाटाळ करू लागली. त्यामुळे मनसैनिकांनी बँक व्यवस्थापकाला चांगलाच चोप दिला.

By

Published : Jul 4, 2019, 7:03 PM IST

बँक व्यवस्थापकाला बोलताना मनसे कार्यकर्ते

यवतमाळ- गरीबांचा पैसा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँक व्यवस्थापकाला मनसैनिकांनी चांगलेच चोपले. वणी येथील सहारा बँकेच्या कार्यालयात ही घटना घडली आहे. बँक व्यवस्थापकाला चोपल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली.


वणी येथे सहारा बँकेचे कार्यालय आहे. या बँकेच्या माध्यमातून आर. डी. तसेच डिपॉझीट गोळा करण्याचे काम करण्यात येत होते. अतिरिक्त व्याजाचे आमिष दाखविल्यामुळे सर्वसामान्य जनतेनी आपल्या मेहनतीच्या पैशाची गुंतवणूक या बँकेत केली. मात्र, आरडीचा कालावधी संपल्यानंतरही गुंतवणूक करणाऱ्यांना पैसे परत देण्यास बँक टाळाटाळ करू लागली. याप्रकरणाचा जाब विचारण्यासाठी मनसे प्रदेश उपाध्यक्ष राजू उबंरकर हे कार्यकर्त्यांसह बँकेत आले.


बँक व्यवस्थापकाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने राजू उबंरकर यांनी बँक व्यवस्थापकाला कार्यालयातच चोप दिला. या घटनेमुळे बँक परिसरात चांगलीच खळबळ उडाली. गुंतवणूकदारांचे पैसे लवकर परत करा, अन्यथा यापुढे आपली मनसेशी गाठ असल्याची तंबी उबंरकर यांनी बँक व्यवस्थापकाला दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details