महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 19, 2020, 10:54 AM IST

ETV Bharat / state

'एमएच 29 हेल्पिंग हँड्स'ची माणुसकी, मुक्या प्राण्यांना खाद्याचा पुरवठा

वाइल्ड अॅड्व्हेंचर आणि नेचर क्लब यवतमाळतर्फे मोकाट श्वान, गाय, माकड यांना कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या दिवसापासून खाद्य पुरविले जात आहे. यवतमाळ जिल्ह्यातील जागरूक नागरिक यांच्यातर्फेदेखील एक हाथ मदतीचा या मोहिमद्वारे आर्थिक मदत आणि खाद्य पदार्थ संस्थेला प्राप्त होत आहेत. तर, जनतेने सामाजिक बांधिलकी ओळखून मदत करावी, असे आवाहन सूरज खोब्रागडे यांनी केले आहे.

एमएच 29 हेल्पिंग हँड्सकडून मुक्या प्राण्यांना खाद्य पुरवठा
एमएच 29 हेल्पिंग हँड्सकडून मुक्या प्राण्यांना खाद्य पुरवठा

यवतमाळ- लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट असणाऱ्या अनेक कामगारांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे. अशांच्या मदतीला अनेक सामाजिक संस्था आणि नागरिक धावून येत आहेत. मात्र, याकाळात मुक्या प्राण्यांचेही हाल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर यवतमाळ शहरात एमएच 29 हेल्पिंग हँड्स संस्था मुक्या प्राण्यांना कोरोनाच्या संकटात खाद्यपाणी पुरवीत आहे.

'एमएच 29 हेल्पिंग हँड्स'ची माणुसकी, मुक्या प्राण्यांना खाद्याचा पुरवठा

वाइल्ड अॅड्व्हेंचर आणि नेचर क्लब यवतमाळतर्फे मोकाट श्वान, गाय, माकड यांना कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या दिवसापासून खाद्य पुरविले जात आहे. यासाठी संस्थेचे अध्यक्ष सुरेश देशभ्रतार, निलेश मेश्राम, प्रज्वल तुरकाने, अजित गजभिये, सदृ पाटील, रवि शेनकुले, अंकित पवार, अंकित कोथळे पुढाकार घेत आहेत.

यवतमाळ जिल्ह्यातील जागरूक नागरिक यांच्यातर्फेदेखील एक हाथ मदतीचा या मोहिमद्वारे आर्थिक मदत आणि खाद्य पदार्थ संस्थेला प्राप्त होत आहेत. तर, जनतेने सामाजिक बांधिलकी ओळखून मदत करावी, असे आवाहन सूरज खोब्रागडे यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details